Skip to main content

जीवनमान

माझी तू त्याची होताना .. एक आठवण .. एक प्रवास...

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 28/12/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
सांग ना सखे तूच आता माझ्या पासून दूर जाताना काय वाटते तुला आज माझी तू त्याची होताना मुक्त्त करुनि या बंधना जोडुनी नवा अनु-बंध हा काय वाटते तूला आज माझी तू त्याची होताना ? एकाच वाटेचे पक्षी आपण पण मी या दिशेला अन तू विरुद्ध दिशेला जाताना काय वाटते तुला आज माझी तू त्याची होताना ? माझ्या डोळ्यातील आसु अन तुझ्या ओठांवरील हसु यांचे साधर्म्य जाणताना सांग ना सखे तुच आता काय वाटते तुला आज माझी तू त्याची होताना ? सांग ना सखे तूच आता माझ्या पासून दूर जाताना अर्धांग येथेच सोडून काय वाटते तुला आज त्याची अर्धांगीनी होताना ?

ह्य ह्य..

लेखक गवि यांनी सोमवार, 27/12/2010 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
"..मला काल रात्रीच कळलं. मग पंचवटीने आलो सकाळी निघून." "बसायला जागा मिळाली का पण?" "हो..रिकामी होती आज एकदम..झोपून आलो..ह्य ह्य.." "ह्य ह्य.." ... "बरं.. काय झालं एकदम?.." "काल रात्री चांगले होते. सकाळपासून जोक्स बिक्स करत होते. योगासनं पण केली.. रात्री पिठलं टाक म्हणाले. मग टी.व्ही. बघत बसले होते. एकदम संडासला लागली म्हणाले. त्यांना कमोड लागतं ना. ते अशोकनं आतल्या बाथरूम मध्ये बसवलंय..फोल्डिंग टाईपचं. मग जरा हात धर म्हणाले अशोकला..तेव्हाच त्याला शंका आली. ..आणि मग संडासच्या वाटेतच त्यांचा तोल गेला..काहीतरी बोलले म्हणे अशोकशी आणि एकदम डोळे फिरवले." "बरं झालं पटकन गेले.

पूर्णब्रह्म!

लेखक असुर यांनी सोमवार, 27/12/2010 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 21/12/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं.

मसल्स दिखाऊ संस्कृती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 21/12/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान! आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच. व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या.

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 21/12/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५.

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 20/12/2010 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे प्राथमिक शाळा .वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे