Skip to main content

जीवनमान

ग्रो अप बेब्ज..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 16/02/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो.. तर .. वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं.

काहि मह्त्वाचे

लेखक अनिल आपटे यांनी बुधवार, 16/02/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योत प्रकाश देते बरोबर पण ती अंधार दूर करते हे महत्वाचे. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटते बरोबर पण दर्शन घेतल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो हे महत्वाचे. वृक्ष सावली देतो बरोबर पण तो पक्षांचा निवारा आहे हे महत्वाचे. मायबाप आपल्याला वाढवतात बरोबर पण त्यात विधात्याचा हात असतो हे विसरून चालणार नाही हे महत्वाचे.  अक्षरामधून शब्द तयार होतो शब्दातून अर्थ निघतो अर्थामधून आनंद मिळतो  असे अर्थबद्ध शब्द हृ

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 15/02/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिनाच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार पाखरं मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. कॉलेजपणात नंतर आल्यावर कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या, मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन मनात आठवणींनी गंधलेला सुगंध शहरभर पसरत असे. आता नव-शहरीकरण झाल्यावर व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि मॉनिटर समोर बसुनही आठवणींच्या सुगंधाचा भास जाता जात नाही.
काव्यरस

लै समस्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 14/02/2011 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

भीतीचं इंजेक्शन..!

लेखक गवि यांनी सोमवार, 14/02/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा" या पुस्तकातून ..पण सुधारित आणि पुनर्लिखित.. .................... मी रात्री दोन वाजता भकास डोळ्यानी जागत बसलेला असतो.. छोटा बाळ बाजूला झोपलेला..बायको ही बिचारी शांतपणे डोळे मिटून पडलेली.. सुखात आहेत दोघं.. त्यांना काहीच कल्पना नाही.. हे मल्टिपल स्क्लेरॉसिसचं आत्ताच कळलंय...

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे अगदी मोबाईल नंबर सहित.