Skip to main content

जीवनमान

|| दक्षिणायण ||

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 20/12/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे. भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे.

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

सायबानू मीच त्यो .... अंतिम

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/12/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/node/15817 भाग २ http://www.misalpav.com/node/15840 भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो..

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रोळीच्या संपतला मी म्हटले तु रूळावर काय शी करायला बसतोस? अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून? तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे तशी संपत म्हणाला - साहेब

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल .. कहाणी .. १.

कासाराचा गोईंदा

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

एक नवी काळजी

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/12/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे. ______ काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

मोरपिसे....

लेखक भानस यांनी बुधवार, 08/12/2010 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला.

एकास तीन

लेखक अवलिया यांनी बुधवार, 08/12/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची कंपनी पर्यावरणाविषयी अत्यंत जागरुक असल्याने प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात तीन तीन झाडे आम्ही लावली असुन कायद्याचे पालन करण्यात कोणतीही कसुर केलेली नाही आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत पावडरचे थर थापलेली हसतमुख तोकड्या स्कर्ट बाह्या घातलेली बाहुली मान वेळावुन वेळावुन पत्रकार परिषदेत सांगत होती आणि एलसीडी प्रोजेक्टरवर दाखवत होती कंपनीच्या एमडीच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो केलेल्या खर्चाचा हिशोब एकाला तीन झाडे घातलेले किलोलीटर पाणी इतके टन शेणखत वगैरे.. निर्विकार मनाने पत्रकार उतरवुन घेत होते कागदावर किंवा रेकॉर्ड करत होते मोबाईलवर दुसर्‍य