Skip to main content

जीवनमान

कामापुरता नर

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.

इग्नोबल पुरस्कार

लेखक विकास यांनी बुधवार, 09/02/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो? आपल्याला सगळ्यांना नोबेल पुरस्कार माहीत आहे. सोप्या शब्दात, त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इग्नोबल पुरस्कार. १९९१ साली हार्वर्ड-एम आय टी या दोन्ही विद्यापिठांतर्गत असलेल्या संस्था/व्यक्ती यांनी इम्प्रॉबेबल रिसर्च अशी संस्था चालू करून "discoveries that cannot, or should not, be reproduced" साठी म्हणून हा मजेशीर पुरस्कार चालू केला.

कामवाल्या बाई आणि आय. टी.

लेखक Pearl यांनी बुधवार, 09/02/2011 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्‍याचदा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात. अशा वेळी घरातले काम, साफसफाई, धुणीभांडी, स्वयंपाक, मुलांच्याबरोबर वेळ घालविणे, गप्पा मारणे, पेपर वाचणे अशा कितीतरी गोष्टी रोजच्या रोज करायच्या असतात. पण सगळी कामं काही स्वतः घरी करणे शक्य नसते. मग आपण काय करतो तर, जी काही रटाळ, कंटाळवाणी, non-value addition वाली कामं असतात, ज्या कामासाठी खूप expertise लागत नाही, ज्यात थोडंफार इकडं तिकडं झालेलं चालतं ती कामं आपण outsource करतो. I mean त्या कामांसाठी आपण कामवाल्या बाई लावतो.

रूममेट

लेखक ज्ञानेश... यांनी बुधवार, 09/02/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साडेसात. तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस. ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच. गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय. गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा. तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला.

स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 08/02/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला. * किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या.

जोगवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 08/02/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती.

कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 05/02/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा. मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर --तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे. सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.

मेला मैदा

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 05/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'आईईई.... प्लीईज्ज्ज... पिझ्झा कर न...किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.' आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने! हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात?

माझे अस्वस्थ मन व टेबलावरच्या गोष्टींतला अर्थ.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 05/02/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना:लेखामधे नाईलाजाने काही अपशब्द टाकावे लागलेत्,लेख स्वःताच्या जबाबदारीवर वाचावा. "भे**** पुरता फसलोय रे!" मी ग्लास टॉप टु बॉटम उतरवुन बोललो. "का? आता काय झाल?