Skip to main content

जीवनमान

जीवनमान — जीवनशैली, आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन जगणे यांवरील मराठी लेख. जीवन अधिक अर्थपूर्ण करणारे अनुभव व मार्गदर्शन येथे वाचा.

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

लेखक यकु यांनी गुरुवार, 22/03/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.

नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

काहीतरी विधायक करावं !! भाग १

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 21/03/2012 19:49 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

प्रस्तावना :
१. ही कोणतीही जाहीरात नाही.
२. ह्यात कोणताही स्वार्थ नाही.
३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही.
४. गैरसमज नकोत. ;)

धन्यवाद.

खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्‍या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला.

धुक्यात हरवली मुंबई

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 21/03/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.

आज दुपारी दिडच्या सुमारास जेवायला भोजनकक्षात गेलो असता सर्वत्र दाट धुके दिसले. माझी कचेरी कालिना -बीकेसी भागात आहे. आमच्या इमारतीच्या मागच्या बाजुने पश्चिम द्रुतगती मार्ग सरळ रेषेत जेमतेम १ किमी असेल. मात्र तो दिसेनासा झाला होता. सी लिंक वा वरळीच्या इमारती दिसणे तर दूरच.

हे धुके कसे काय? सकाळी येताना स्वच्छ प्रकास होता. आता गारवा संपला असून रखरखाट सुरू झाला आहे. मग हे धुके कसले? प्रदुषण तर नेहेमीचेच आहे. आणि धुर थिजुन धुके व्हायला थंडी तर हवी?

fog 4

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 19/03/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.

कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-)

एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं
अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती...

मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु
चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या...

तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार
सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा... ;-)

आंम्ही पोहोचता मुक्कामी,प्रथम येवोनी थडकली चिमी
मोदका फोनवता आंम्ही,शीघ्र तो ही धावला...

मागोनी वल्ली आणी पक पकं,येताच अन्य कितिक...
मिपा परंपरेप्रमाणे,तेथे हलकल्लोळ जाहला...

पाटाला भसा भसा पानी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/03/2012 15:49 या दिवशी प्रकाशित केले.

https://www.misalpav.com/node/21045#comment-381773

समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार...
(चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...)

सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी
हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥

काव्यरस

नर्मदे हर!

लेखक पैसा यांनी रविवार, 18/03/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.

नर्मदे हर!

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ

लेखक यकु यांनी रविवार, 18/03/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.

कालच्या सॅ‍‍डीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच.

काशीबाई काशीबाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/03/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||

अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||

तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||

नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३||

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.

माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.