Skip to main content

जीवनमान

खस्स्स्स्स् स्स्कन्..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

आमचं पण महाभारत

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी. चांगला खाऊन पिऊन सुखी होतो तर ते ह्यांना बघवलं नाही. खायला अन्न नाही, रपेटीला घोडे नाहीत, शेतात राबायला मजूरही नाहीत. सगळ्यांना धरून नेलं. म्हणे युद्ध आहे. महायुद्ध. वर त वर युद्धानंतर दिवसाअखेरी सैनीकांना लागेल म्हणून दारूवरही रेशनींग सुरू केलं. टिआरपी खेचण्यासाठी काय काय नाही केलं ह्यांनी? पोपटाचे डोळेच काय फोडले, झाडंच काय उपटली, एकमेकांना विष काय घातलं, हत्तींना सोंडेला धरून फेकूनच काय दिलं...

(धप्पकन)

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 12/04/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

मला समजलेले चिऊ आणि काऊ

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 12/04/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणादायी लेख http://www.misalpav.com/node/21326 प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे. काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,....

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

भळ्ळकन ..

लेखक गवि यांनी बुधवार, 11/04/2012 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला.. कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार.. डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा.. कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(पूर्वप्रकाशित)

नीतिमत्ता

लेखक सहज यांनी मंगळवार, 10/04/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
वडीलोपार्जीत संपत्ती? मानवतेचा ठेवा? स्त्रीधनच. बहुतेक वापरु की नको? जग कुठे चालल्लेय? ---------- उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला? ----------------------- ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? -------------------------- म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या. तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नाही जाणार पळून, नाही होत मी भ्रष्ट. ज्यांनी दिले, ते अजरामर झाले. स्साली, जरा बोलू दिले, तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..

हे बंध रेशमाचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 09/04/2012 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.