✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विहिर विचारी समुद्राला...

स
सोत्रि यांनी
Sat, 03/17/2012 - 15:20  ·  लेख
लेख
एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना. पण काही वेळा काही प्राण्यांचा खूपच अतिरेक व्ह्यायचा. ते थेट आकाशातून विहरीत पडल्यासारखे, स्वत:ला प्रेषित समजून इतरांना तुच्छ लेखायचे. त्यांनी तटच पाडले होते. उच्चभ्रू म्हणजे फक्त तेच जे विचार करू शकणारे आणि इतिहास घडवणार असा आत्मविश्वास (फाजील ?) असणारे व बाकीचे उपेक्षित, वैचारिक दलित जे विचार मांडू शकतात पण विस्कळीत, 'सप्रमाण' सिद्ध न करू शकणारे. त्या उपेक्षितांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे व्ह्यायचे बर्‍याच वेळेस. खूप गोंधळ व्ह्यायचा. मग मालकाला आणि त्याच्या 'मुनीम'जींना अशा गोंधळ करणार्‍या प्राण्यांच्या मुसक्या आवळाव्या लागायच्या, नाइलाजानेच. त्यालाही ते सर्व प्राणी प्राणाहून प्रिय होतेच. सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असे त्याला वाटायचे. अशा 'वैविध्यतने नटलेल्या' विहीरीचा त्याला सार्थ अभिमान होता. पण आगतिक होऊन त्याला असे कडक पाऊल कधीकधी उचलावे लागायचे. परंतू एकदा फार मोठा,प्रचंड, महाप्रलय झाला. खुपशी भौगोलिक उलथापालथ झाली आणि चक्क एक समुद्रच वाटावा असा एक मोठा जलाशयच विहीरीच्या शेजारी तयार झाला. नुकताच भारत सरकारचा नद्याजोडणी प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे सर्वच प्राणी इकडच्या तिकडच्या पाण्यात जाऊ शकत होते. लोकशाही किंवा रामराज्यच होते म्हणा ना. त्यामुळे ज्याला जे पाणी अनुकूल वाटत होते तिथे जाऊन तो त्या पाण्यात डुंबून आनंद मिळवत असे. विहीरीतले बरेच उच्चभ्रू प्राणी त्या जलाशयाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनीच त्या जलाशयला समुद्र असे नामाभिमान देऊ केले. हे त्या नामाभिमान मात्र त्या विहीरीतल्या प्राण्यांना ठाऊकच नव्हते. सर्व आलबेल आहे असे वाटावे अशी परिस्थीती होती. पण अचानक त्या मोठ्या जलाशयातले प्राणी विहीरीत येऊन त्या जलाशायाला त्यांनी समुद्र असे त्यांनी नामाभिमान दिले आहे असे सांगू लागले. समुद्रात कशी मज्जा-म्ज्जा असते, किती गुण्यागोविंदाने सगळे नांदतात हे सांगू लागले. समुद्रात खूप खूप जागा आहे, 'ऐस'पैस पसरता येते सर्वांना, विहीर फारच छोटी आहे हे सांगायचा प्रयत्न करू लागले. विहरीत सर्वांना संकोचित आयुष्य जगावे लागते आहे आणि त्यामुळे एकप्रकारची जैविक उत्क्रांती होऊन सर्व प्राण्यांचे बेडूक ह्या प्रजातीत रुपांतर झाले आहे आणि 'कूपमंडूक' प्रवृत्तीचा फैलाव झाला आहे असे एक मतप्रवाह त्यांनी विहीरीत सोडून दिला. समुद्रात कसे 'रामराज्य' आहे असे सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न जोर-जोरात होऊ लागला. अरेच्चा, विहीरीतल्या प्राण्यांना काहीच कळेना. हे काय? असे तर इथे होतेच, नव्हे नव्हे आहेच, मग हे काय नविनच? त्यांना काहीच कळेना की हा नविन समुद्र म्हटला जाणारा जलाशय म्हणजे नेमके काय? फार वैचारिक गोंधळ होऊ लागला. मग विहीरीलाच रहावेना, ती विहीर अखेर त्या समुद्रक्षम जलाशयाला विचारती झाली, 'हे विशाल 'ऐसी' ख्याती असलेल्या समुद्रा, माझ्या माहितीप्रमाणे समुद्राचे बरेच प्रकार असतात. जसे की समुद्र, महासमुद्र, पीत समुद्र, काळा समुद्र आणि चक्क मृत समुद्रही. तर हा जलाशय ह्यातला नेमका कुठल्या प्रकारचा समुद्र समजायचा आम्ही?' वि.सू.: ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे, ईतर काही शोधण्याचा प्रत्यत्न केल्यास समुद्राच्या खारटपणाशिवाय काहिही हाती येणार नाही. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30594 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत

गणपा
Sat, 03/17/2012 - 15:34 नवीन
यावर कसला काथ्याकुट अपेक्षीत आहे याचा लेखक महाशयांनी म्या पामरासाठी खुलासा करावा. ;) मनीच्या बाता : गण्या लेका जागा हो. लै फटाकं वाजणार हैत. :)
  • Log in or register to post comments

आमच्या सगळीकडच्या मित्र

यकु
Sat, 03/17/2012 - 15:41 नवीन
आमच्या सगळीकडच्या मित्र मैत्रिणींचा प्रश्न आहे.. हा महाराष्ट्राच्या एकतेचा, मराठीच्या अस्मितेचा आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि जगभरात पसरलेल्या मराठी माणसांच्या जालीय अस्तित्त्वाचा प्रश्न आहे आणि आज काय ती निवड करायची वेळ आली आहे तर मग आजच्या १७ तारखेच्या निवडणुकीला मतदान केंद्रात जा. प्रेमानं विहीरीकडं एकदा बघा, समुद्राकडं एकदा बघा. मशीनवर समुद्राच्या चिन्हावरचं बटण दाबा किंवा शिक्क्याचा ठसा मारा घरी या. तुमच्या मुला लेकरांना समुद्रात लोटण्याची तयारी करा. येत्या पाच दिवसात त्यांना समुद्राच्या पाण्यात भिजवून, समुद्र गोठल्याच्या काळात त्याच समुद्राच्या मीठात खारवण्याची जबाबदारी हा सोत्रि घेतोय !!!!
  • Log in or register to post comments

तुमचे डावपेच आम्हाला कळतात

धन्या
Sat, 03/17/2012 - 18:01 नवीन
तुमचे डावपेच आम्हाला कळतात बरं कमोड अभिजन. ;) तुम्ही आता पुढारलात. तुमची प्रगती झाली. तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणू लागलात. कमोड वापरु लागलात. पण म्हणून काय ज्या भारतीय बैठकीवर काल परवापर्यंत तुम्ही तुमच्या विचारांचा निचरा केलात त्याला आज तुम्ही नांव ठेवायला निघालात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ते काही असो ! तुम्हा

यकु
Sat, 03/17/2012 - 18:19 नवीन
ते काही असो ! तुम्हा कातडीसोलू लोकांचं या विहीरीत काही खरं नाहीय. ;-) फार झालं. तुम्हाला शिक्षणं दिली, सवलती दिल्या एवढंच काय स्वतःच्या मुली सुद्धा दिल्या ( काही आपण होऊन हात धरूनही गेल्या ) - तुमचे जुने धंदे सुटत नाहीत. आणि तुम्ही तेच तमाशे रोज करता. तुम्ही तिकडे समुद्रावर जा आणि तिकडे तुमची लक्तरं वाळू घाला, भिजत घाला जे काय करायचं आहे ते करा. एवढा प्रचार चालू आहे तो ऐका, जे काय दारू - मांस- मच्छी मागायची असेल तर मागा, किंवा आणखी सवलती घ्या आणि तुम्ही तिकडे जाच! तिकडे सगळं मोकळं मोकळं आहे - जिकडे घाण करायचीय तिकडे करुन ठेवा जागा असे पर्यंत. मग तिथूनही तुम्हाला फुटावं लागेलंच - नाहीतर मग तीच अभिजनांच्या खुशमस्कर्‍या सेवेची वैचारिक महारकी पुन्हा करावी लागेल किंवा तिथेही पुन्हा लढे द्यावे लागतील. जा त्याची तयारी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बाकी या पुजाविधी सांगून

यकु
Sat, 03/17/2012 - 19:56 नवीन
बाकी या पुजाविधी सांगून पोटार्थी आयुष्य गेलेल्यांना इंटरप्रिटेशन मागाहून करण्याची कधीपासून सवय लागली? च्यायला कमाल आहे - शॅमेलियनलाही हे कौशल्य जमत नसेल. हे पूर्वी म्हणे जगाला कळण्याआधी कशाचाही अर्थ सांगायचे.. यांनी धर्मग्रंथ लिहीले - हजारो वर्षे समाजाचा बुद्धीभेद करीत जगत गेले. काळ बदलला तसे यांच्या पार्श्वभागी रट्टे बसले आणि मग यांच्या खोपडीत मुक्त विचार, स्वातंत्र्य, समानतेचे वारे घुसले. एवढंच काय, बापजाद्यांनी केलेली पापं आपल्या माथ्यावर नकोत म्हणून याच पुजाविधी सांगणार्‍यांच्या पुढच्या आवृत्त्यांनी हजारो वर्षे शोषणाचे साधन असलेला देवच रद्द करून टाकला. इथे अस्तित्वच धोक्यात आल्यावर कसला देव आणि कसलं काय? वरून बुद्धीला देवाचं अस्तित्व पटत नाही म्हणून बुद्धीवादी नास्तिक हा मुखवटा मिरवायला मोकळे. यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी यांचे मुखवटे फाडले पाहिजेत आणि जाब विचारला पाहिजे. त्यामुळं आजकाल जगाला आधी अर्थ सांगू देतात होय ? बरं. म्हणजे नंतर ईश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान असा सगळ्यांनाच पसंत पडेल तो अर्थ सांगायचा. छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बाकी

sneharani
Sat, 03/17/2012 - 15:43 नवीन
बाकी काथ्या काढला आहेच तर तो कुटला जाणारच असं दिसतेय!! ;) विकांताला धागा टाकला तरी शंभरी नक्कीच ! ;)
  • Log in or register to post comments

समुद्र म्हटला तरी तो खार्‍या

सूड
Sun, 03/18/2012 - 08:51 नवीन
समुद्र म्हटला तरी तो खार्‍या पाण्याचा. विहीरीतल्या गोड्या पाण्याची सवय झालेल्या प्राण्यांना समुद्राचं पाणी कितपत मानवलं असतं याबद्दल शंका येतेय. आणि कथेत विहीरीच्या प्रश्नाला समुद्राने उत्तर दिलेलं दिसत नाही, त्या अर्थी हा मृत समुद्र असावा. अवांतर: ही कथा समुद्रातल्या पापलेट, हलवा, सुरमई किंवा गेला बाजार मांदेलीशी झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा वास येतोय.
  • Log in or register to post comments

सूड्शी सहमत

मी-सौरभ
Mon, 03/19/2012 - 16:10 नवीन
हे वाचून मला ती करकोचा आणि माश्यांची कथा आठवली. समुद्रातून आलेले अन समुद्राचा गौरव करुन आपल्याला तिकडे नेणारे वाटेत त्यांची भूक भागवायला आपल्याला खाऊन टाकणार याचा काय भरवसा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सोत्रि!!

पैसा
Sat, 03/17/2012 - 16:31 नवीन
तुम्ही दारवा कुठे असलेल्या प्राण्यांना देणार आहात?
  • Log in or register to post comments

दारवा संग्रह...

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 18:13 नवीन
पैसातै, विहीरीच्या काठावर बसून प्यायची आणि समुद्रकिनार्‍यावर बसून प्यायची कॉकटेलं / दारवा वेगवेगळ्या असतात. मला दोन्ही प्रकारांची माहिती आहे. ;) त्यामुळे ज्याला ज्या प्रकारची दारवा हवी आहे त्या प्रकारची दारवा माझ्या 'कॉकटेल लाउंज' मध्ये संग्रही आहे, चिंता नसावी. :) - (विवीध दारवा संग्राहक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हुश्श्य!

पैसा
Mon, 03/19/2012 - 18:26 नवीन
मला लोकांच्या लिक्विड डायटची चिंता लागली होती! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तु किनै पैसातै, तुझा आयडी

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 18:45 नवीन
तु किनै पैसातै, तुझा आयडी बदलून चिंता'मनी' ठेव बै. भारीच चिंता तुला लोकांची ;) - ('तुम्ही' वरून 'तु' वर आलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Mon, 03/19/2012 - 18:51 नवीन
चिंता करिते विश्वाची! सगळ्यात मोठी चिंता पैशांची, म्हणून आयडीत बदल नाही. मी काय पैशांची विहीर खणली नाहीये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ह्म्म्म...

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 19:25 नवीन
चिंता'मनी' मधला मनी हा पैशासाठीच होता गं! मनी वर 'कोटी' केली होती. इथे कोटीवरही कोटीच आहे. सगळं कसं ना तुला इस्कटून सांगावं लागतं. - (कोटीबाज) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/19/2012 - 18:32 नवीन
विहीरीच्या काठावर बसून प्यायची आणि समुद्रकिनार्‍यावर बसून प्यायची कॉकटेलं / दारवा वेगवेगळ्या असतात. मला दोन्ही प्रकारांची माहिती आहे.
बेडकांनी प्यायच्या आणि शार्क माशांनी प्यायच्या येगयेगळ्या असत्यात का हो ? कोळी परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ब्वॉरं...ब्वॉरं...

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 18:40 नवीन
तर व्हं पाव्हनं, तसंच असतया! तुमास्नी कंची हवी म्हणायची ? - (कलाल) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे कोल्या,

पैसा
Mon, 03/19/2012 - 18:41 नवीन
बेडकानी प्यायली की शार्कला आपोआपच मिलंल ना! यवरां म्हायत नाय तुकां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आमी भटजीबुवाना म्हनलं व्हत़ं

धन्या
Mon, 03/19/2012 - 18:47 नवीन
आमी भटजीबुवाना म्हनलं व्हत़ं की जरा धीर दम धरा. गडी मान्सं गावाकडं गेल्याती. परत आली की बगा कसं हीरीचं पानी भसाभसा पाटाला जातंय ते. हितं तं पान्याची काय बातच नाय. समदी दारवांची बात करत्येत. पीक लय टरारुन येईल बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चुक

वपाडाव
Mon, 03/19/2012 - 18:49 नवीन
बेडकानी प्यायली ऐवजी बेरकानी पिली हवं होतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/18/2012 - 08:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माज्या

तिमा
Sat, 03/17/2012 - 19:38 नवीन
माज्या 'हिरीला' इंजन बसवा!
  • Log in or register to post comments

हीरीला इंजन कवाच बसवून झालंय

धन्या
Sun, 03/18/2012 - 10:28 नवीन
हीरीला इंजन कवाच बसवून झालंय दादा. मजूर मानसं सुटीपायी गावाकडं गेल्याती. जरा दम धरा. मजूर मान्सं परत आली की बगा पाटाला कसं भसाभसा पानी जातंय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

@मजूर मान्सं परत आली की बगा

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/18/2012 - 15:50 नवीन
@मजूर मान्सं परत आली की बगा पाटाला कसं भसाभसा पानी जातंय ते.>>> धनाजी रावांशी आमी हंड्रेड परशेंट सहमत... लै कटाळा आलाय बगा...ह्ये विहिर,,बेडुक,,,समुद्र,,,शंख आनी शिपल्यांचा ..अपल्या..मि.पा.वरचा दंगा कमी हाय का..? तर त्यात ही फुक्काची भरं... धनाजीराव तुमी येक गानं लिवा बगू...ग्येल्या येळ सारखं... कडक... थांबा नायतर,,,,आदी या नस्त्या व्यापाचा मीच पिट्टा पाडतो जमल तसा... तुमी आक्शी लै कामात हाय ना... पन तरी या येळ काढुन तिकडं बी,,जरा हातभार लावाया... कारन तुमच्या विना लावनी,मंजी वाळुत सोडल्यालं पानी. ;-) ... या मंग ...आमी होतो म्होरं http://www.misalpav.com/node/21055 या हिकडच्या लिंकिंग रोडवरुन... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तसं न्हाई...

धन्या
Sun, 03/18/2012 - 18:57 नवीन
आवो तसं न्हाई भटजीब्वॉ... सन्वार रैवारीही सुशिक्शीत मान्सं रजा घेत्याती, घरी आराम करत्याती. सोम्मॉर उज्याडूंदया, मग बगा कसं इंजन चालू करुन ह्या हीरीचं पानी बगा कसं भसाभसा पाटाला घालत्याती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

डराव डराव

नगरीनिरंजन
Sun, 03/18/2012 - 08:58 नवीन
ह्यात फक्त आणि फक्त साहित्यमूल्यच शोधण्याचे करावे,
अवघड पेच टाकला आहे सोकाजींनी. ;-) असो. लहान बेडकांना विहीरीत आणि समुद्रात दोन्हीकडे काहीच धोका नसतो असे स्वानुभवावरून वाटते. बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.
  • Log in or register to post comments

बाकी यानिमित्ताने आमच्या एका

धन्या
Sun, 03/18/2012 - 10:26 नवीन
बाकी यानिमित्ताने आमच्या एका मित्राच्या तीन खोल्यांच्या घराचे नाव गणेश 'प्रासाद' आहे ते आठवले.
बर्‍याचशा गोष्टी या मानण्यावरच असतात अशी थोरा-मोठयांची शिकवण आहे. मानलं तर भानामती आहे मानलं तर नाही. स्त्रीयांचा जालावरचा वापर पुरुषांइतकाच वाढला म्हणजेच स्त्री पुरुष समानता आली हे सुद्धा आपल्या मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आता परत सगळे इथे येतील

किचेन
Wed, 03/21/2012 - 17:22 नवीन
आता परत सगळे इथे येतील भांडायला..... ती विहीर...तो समुद्र, बायांची मत: विहिरीचा आकार लहान म्हण स्त्रीलिंगी, समुद्राचा आकार मोठा म्हणून.............;) बाप्यांची मत: समुद्र खारा म्हणून लगेच तो का? ........;) विहीर विचारी समुद्राला....अरे हे काय....ती विचारतीये..म्हण्जे तिला माहित नाहीये...म्हण्जे ती अज्ञानी...म्हणून विहीर स्त्रीलिंगी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हम्म.............समुद्रात

पियुशा
Sun, 03/18/2012 - 13:04 नवीन
हम्म............. समुद्रात फार फार तर दोन - तीन दिवस खेळायला मजा वाटते, पण त्या खार्या पाण्याने "तहान" थोडीच भागवली जाणार आहे म्हणुनच खारावलेल्या पाण्यापेक्षा गोडया पाण्याची विहीर च बरी आहे असे नम्रपणे नमुद करु ईच्छीते :) ( अर्थात हे माझ वैयक्तिक मत आहे ) :)
  • Log in or register to post comments

'जलाशयातले' खारे पाणी ......

नावातकायआहे
Sun, 03/18/2012 - 13:26 नवीन
'जलाशयातले' खारे पाणी विहिरीत झिरपुन विहिर 'बाटली ' नाही म्हणजे झाले. आम्ही आपले विहिरीत बरे.... ड्रांव.. ड्रांव
  • Log in or register to post comments

माका येक समजुन सांगा, ह्ये

स्पंदना
Sun, 03/18/2012 - 18:43 नवीन
माका येक समजुन सांगा, ह्ये समुद्रातल प्राणी फिरुन आमच्या हिरीत का येत्याती जर तित येव्हढी मज्जा हाये तर? ऑ? जावा की म्हणाव गप गुमान तिकडच त्वांड करुन अन काय आसल ती मज्जा बी करा, उगा पिरपिर लावायची हित्त येउन. ह्यॅअव अन त्यॅव.
  • Log in or register to post comments

कंत्राटं?

स्मिता.
Sun, 03/18/2012 - 20:44 नवीन
काय हो सोत्रि, जुना दारवांचा धंदा सोडून नवीन कंत्राटं घ्यायला सुरुवात केलीये की काय? ;)
  • Log in or register to post comments

सोत्री ब्याक इन फॉर्म..

मोदक
Sun, 03/18/2012 - 21:59 नवीन
द्रवीडचा आदर्श घेतला आहे का..? त्याने टेस्ट मध्ये सलग ४ इनींगमध्ये सेंच्यूरी मारली होती.. १०० + प्रतिसादांची खात्री असलेला हा दुसरा धागा. ;-)
  • Log in or register to post comments

हा घ्या

मी-सौरभ
गुरुवार, 03/22/2012 - 23:01 नवीन
प्रतिसाद क्रमांक १००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भविष्य खरे ठरले.... ;-)

मोदक
Fri, 03/23/2012 - 23:31 नवीन
मी पण पोपट विकत घेवून साईड बिझीनेस टाकावा म्हणतो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/19/2012 - 00:27 नवीन
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा मुद्दा करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते..... विहीर काय किंवा समुद्र काय, दोन्ही गोष्टी म्हणजे जग नव्हे. तिथे जावे, मनसोक्त पोहावे आणि बाहेर पडून खऱ्या जगात मन रमवावे. विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते. (काही काळ मी स्वत: पण त्यातून गेलो आहे). विहीर आणि समुद्र ही करमणुकीची साधने आहेत. ती तितकीच असू द्यावी.
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Mon, 03/19/2012 - 01:10 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पुन्हा विचार करा

यकु
Mon, 03/19/2012 - 05:09 नवीन
लोकांकडे कुठल्याही गोष्टीचा मुद्दा करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते..... विहीर काय किंवा समुद्र काय, दोन्ही गोष्टी म्हणजे जग नव्हे. तिथे जावे, मनसोक्त पोहावे आणि बाहेर पडून खऱ्या जगात मन रमवावे. विहिरीतून किंवा समुद्रातून बाहेर पडल्यावर पण ज्यांच्या डोक्यात तिकडचाच विचार चालू असतो त्यांची कीव वाटते. (काही काळ मी स्वत: पण त्यातून गेलो आहे). विहीर आणि समुद्र ही करमणुकीची साधने आहेत. ती तितकीच असू द्यावी.
विमे, एकतर तुम्हाला पूर्ण पार्श्वभूमी माहित नाही किंवा तुम्ही दोन्हीकडे 'यूज अ‍ॅण्ड थ्रो' एवढाच विचार करताय. विहिर आणि समुद्र ही करमणूकीची साधने असली तरी तुमचा कुठला ना कुठला भाग इथे जगतोय.. भाग कसला, इथे येता तेव्हा तुम्ही आभासी रूपात असेल पण पूर्णच्या पूर्णच इथे जगता की तोही आभास असतो? हे मधलं माध्यम फक्त आभासी आहे आणि तिकडे बसलेले तुम्ही आणि इकडे बसलेला मी खरे आहोत आणि खर्‍याच जगात बसून खर्‍याच जगात मन रमवतो आहोत असे मला वाटते. हे जे तुम्ही वर मत व्यक्त केले आहे ते करमणुकीसाठी केले आहे का? ते मत खर्‍या लोकांनी वापरायचे की इथे सगळे आभासी लोक आहेत? इथे चर्चिल्या जाणार्‍या गोष्टी, इथून मिळणारा आनंद, इथे होणारे वाद, इथून मिळणारी उपयुक्त माहिती, इथली शेअरींग हे सगळं खरं आहे की आभास आहे? हे सगळं होताना कुणा बावळटाला इथे येऊन इथल्या लोकांना बेडूक आणि या जागेला विहिर मानण्याचा आणि तसे इथेच म्हणून दाखवण्याची खूमखूमी असेल तर या एकत्र येण्याच्या जागेवर प्रेम करणार्‍या सगळ्यांनी आपापल्या परीनं ती कशी चुकीची आहे हे सांगायला हवं की नको. तुम्हाला आलेली कीव वगैरे विचारात घेत नाही, तुम्हीच त्यावर पुन्हा विचार करा. विसू : प्रचंड सामर्थ्य यावेळी दोस्ती खात्यावर फाट्यावर मारले आहे, तेवढे तुम्ही चुकते कराल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

यावरुन आठवलं...

धन्या
Mon, 03/19/2012 - 13:53 नवीन
साधारण सात आठ महिन्यांपूर्वी असंच एका मुद्द्यावरुन वातावरण तापलं होतं. नव्हे, ते आम्हीच जनजागृतीसाठी तापवलं होतं. पण आमचे काही मित्र मात्र त्या मुद्दयावर भलतेच शिरेस झाले. आव्हाने प्रती-आव्हाने झाली. आम्हाला फक्त लोकांना सावध करण्यात रस असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर जाऊन त्या आव्हानांचा पाठपुरावा करण्यात काहीच स्वारस्य नव्हतं. झालेल्या चर्चेतून योग्य तो बोध घेऊन प्रत्येकाने वागावे असं आमचं मत होतं. त्यामुळे आम्ही त्या प्रकारातून माघार घेतली. परंतू आमचे त्यावेळचे माघार घेणे आमच्या एका हुशार मित्राला पटले नाही. "तुमच्याकडे फक्त महिती आहे, ज्ञान नाही" अशा खास पुणेरी शब्दांत आमचा उद्धार झाला. आम्ही म्हटले तसे तर तसे. आम्ही मिपावर चार घटका विरंगुळा मिळावा म्हणून येतो. शक्य झालं तर थोडीफार बौद्धिक खाजही भागवून घेतो. नुकत्याच झालेल्या स्त्रीपुरुषसमानतेवरील चर्चेप्रमाणेच काही सामाजिक विषयांवर दोन चार पॅराग्राफ खरडून आपण सामाजिक क्रांतीकार्यास फार मोठा हातभार लावला म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. पण ते एव्हढंच. जालावर आम्हाला अगदी जीवाभावाचे मित्र मिळाले यात वादच नाही. पण तरीही आमचा जालावरचा वावर आणि आमचं खरं आयुष्य या गोष्टी पुर्णपणे वेगळ्या आहेत याची जाणिव मात्र सतत आमच्या मनात असते. यकु, थिंक अबाऊट इट. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

"आभास देखिल खराच असतो आणि खरे

कवितानागेश
Mon, 03/19/2012 - 14:12 नवीन
"आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असते" असे थोडक्यात सोप्पे सांगायचे सोडून किती शब्द वाया घालवलेत! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>> "आभास देखिल खराच असतो

यकु
Mon, 03/19/2012 - 14:23 नवीन
>>>> "आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असते" असे थोडक्यात सोप्पे सांगायचे सोडून किती शब्द वाया घालवलेत ------ हे खरंय की तसा फक्त आभास होतोय? :p :p :p :p : p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

चांगदेव-पासष्टी

धन्या
Mon, 03/19/2012 - 14:40 नवीन
आभास देखिल खराच असतो आणि खरे सगळे शेवटी आभासीच असते
चांगदेव पासष्टी अर्थात ज्ञानदेवांनी चांगदेवाला लिहिलेल्या पासष्ट ओव्यांच्या पत्रामधील पहिली ओवी काहीशा अशाच अर्थाची आहे.
स्वति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

स्वतः परमात्मा दाखवतोय तर

कवितानागेश
Mon, 03/19/2012 - 15:19 नवीन
स्वतः परमात्मा दाखवतोय तर बघावा की आभास मजेत! नावे ठेउ नयेत आभासाला. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्ही कसची नावं

यकु
Mon, 03/19/2012 - 15:34 नवीन
आम्ही कसची नावं ठेवतोय? परमात्मा तोही आभासच दाखवतोय. आणि परमात्मा जर आभास दाखवतोय तर आमच्यासारख्या किड्यांच्या प्रकाशानं कितीसा उजेड पडणार आहे हे माहित आहे हेवेसांनल :) उलट फार जाळ होतोय असं वाटलं तर समजा की आम्ही पण परमात्म्यानं केलेल्या निर्मितीचा भाग आहोत, आणि जाळ होत असेल की आग, आम्ही त्याला काही करु शकत नाही. परमात्मा महान आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

चालू दया...

धन्या
Mon, 03/19/2012 - 15:50 नवीन
जोपर्यंत प्रलयकाळ येत नाही तोपर्यंत तुमचे हे भास आभासाचे खेळ चालू दया. एकदा का कयामत आली की मग सगळीकडे पाणीच पाणी होईल. मग तिथे ना विहीर असेल ना समुद्र. सारे विश्वच जलमय झालेले असेल. खारेपणाच्या आणि गोडेपणाच्या सीमा एकमेकांत विरुन गेलेल्या असतील. आणि मग श्रीवटेश जगाला पुन्हा नव्याने जन्म देतील... तोपर्यंत चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ॐ शांती: शांती: शांती: हरि

यकु
Mon, 03/19/2012 - 15:53 नवीन
ॐ शांती: शांती: शांती: हरि ओम् हरि ओम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा

प्यारे१
Mon, 03/19/2012 - 16:14 नवीन
बाकी सगळं जाऊ दे, तो ॐ कसा टाईपला ते सांग! मी चोप्य पस्ते केलाय. बाकी विहीरीतल्या प्राण्यांकडं येऊन माझा तथाकथित समुद्र किती अगाध, सर्वसमावेशक, किती बहुविध परंपरांचा पाईक, मतांचा आदर करणार इ.इ. जाहिरात करणं आणि पुन्हा मला विहीर आवडत नाहीच हो, या विहीरीतल्या जीवांचं कल्याण करण्याची इच्छा आहे असा साळसूद पणाचा आव आणणं. याच्या जोडीला, परवा परवा पर्यंत विहीरीच्या पाण्यात राहून, विहीरीतल्याच इतर 'बेडकां'ना खाऊन उपजीविका करणारे पाणसर्प आज तथाकथित समुद्राची जाहिरात करताना पाहून अम्मळ भरुन आलं. :) ते ॐ कसा टाईपला ते सांग बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आमच्या कुंपणीच्या इनहाउस

यकु
Mon, 03/19/2012 - 16:20 नवीन
आमच्या कुंपणीच्या इनहाउस किबोर्डात आहे ब्वॉ! जालीय युनिकोडमध्‍ये कसा येतो ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कॅपिटल मध्ये AUM टाइप करून

प्रचेतस
Mon, 03/19/2012 - 16:39 नवीन
कॅपिटल मध्ये AUM टाइप करून येईल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

द्विरुक्ती

यकु
Mon, 03/19/2012 - 16:22 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हंजे..

चिगो
Tue, 03/20/2012 - 12:43 नवीन
>>जोपर्यंत प्रलयकाळ येत नाही तोपर्यंत तुमचे हे भास आभासाचे खेळ चालू दया. म्हंजी, ह्या डिसेंबराच्या २१ तारखेला ही कटकट संपणार म्हणायची.. ब्वॉर्र, २२ ला बघू मग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा