Skip to main content

जीवनमान

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 28/06/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो.... पुढे चालू... ========================= मग ती अमावस्या आली .आणि ठरल्याप्रमाणे आम्ही महाराजाकडे जायला तयार झालो.

व्यायामी ओव्या

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 27/06/2015 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

कधीतरी काहीतरी

लेखक prasadoak7 यांनी शुक्रवार, 26/06/2015 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-3 अंधाराच्या आत जेवण बनवायला हव होत. राकेल मिळवायला किती हेलपाटे मारायला लागत होते. मोठ्या कष्टाने एक कॅन मिळत होता. झोपड्यात येणार्‍या स्त्यावरच्या दिव्याचा प्रकाशत ती रोजच सगळ आवरायची. लेकर आल्यातील म्हणून आज घासलेटचा दिवा पेटवला होता. दिव्याचा प्रकाशात आज बरेच दिवसांनी झोपडीत दिवाळी नाचत होती. हातपाय धुवून त्यान कांबळी अंथरली. पोर धावत बापाला बिलगली. हळूच धाकट्या लेकरान बा ची मांडी पटकावली. बापाची हनुवटी इवल्या हातान हलवीत त्यान विचारल बा त्या रेल्वेचा ड्रायव्हर यवढी मोठी लांब गाडी वळवतो कशी ? थोरली लेक जोरात हसायला लागली . बा न डोळ मोठ करीत तीला गप केल.

कधीतरी काहीतरी

लेखक prasadoak7 यांनी बुधवार, 24/06/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ होत आली. झाडांच्या सावल्या मोठ्या होऊ लागल्या. रस्त्यावरची माणसे कोणत्यातरी अनामिक ओढीने आपापल्या घरी जाताना पाहून मनात अनेक विचारांचे वादळ घोंगावयाला लागले. सायकलवर लटकत असणाऱा जेवणाचा डबा ; डाळ तांदूळ कांदे व भाजी ह्यानी भरलेली ती मळकट पिशवी हे सांभाळत गर्दीत वाट काढत सायकल घराकडे दामटत जाणाऱ्या त्या माणसाला कशाची ओढ असेल बरं ! एक आजोबा डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि पिशवीतून डोकावणारी कोथिंबीर जुडी घेऊन मंद चालीने घराकडे निघालेत. कोण असेल त्यांच्या घरी ? जीवनाच्या सायंकाळी असेल का कोणी तरी त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेल ?

डोमिसाईल हवंय.... ? ?

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 23/06/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 21/06/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. मिपावर वावरणारा एक सामान्य योग प्रशिक्षक या नात्याने सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. IDY २१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री.

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 20/06/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे. रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. आधीच्या पदाधिकार्‍यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती. सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे. तर आता हा त्रास कमी कसा करता येईल? सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे. आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे. येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच. तरी पण त्यांनी जुमानले नाही तर.

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?