Skip to main content

जीवनमान

जीवनमान — जीवनशैली, आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन जगणे यांवरील मराठी लेख. जीवन अधिक अर्थपूर्ण करणारे अनुभव व मार्गदर्शन येथे वाचा.

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

लेखक खेडूत यांनी सोमवार, 15/06/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.

दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला .

सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती.

रिंगा रिंगा रोझेस आणि श्रावण मासी.....

लेखक पद्मावति यांनी सोमवार, 15/06/2015 01:13 या दिवशी प्रकाशित केले.

लहान असतांना आम्ही एक खेळ खेळायचो. रिंगा-रिंगा रोझेस म्हणत एकमेकांचा हात धरून गोल गोल फिरायचे आणि मग ते हाशा-हुशा करत धड़ामकन खाली पडायचे... ते गोल गोल फिरण्यात आणि पडण्यात आम्हाला फारच मजा यायची...आमचा हा अगदी फ़ेवरेट टाइमपास होता.

पुढे कधीतरी एक पुस्तक वाचत असतांना त्यात या खेळाचा उल्लेख वाचला. तो असा कि सोळाव्या शतकात लंडन मधे प्लेग ने धूमाकुळ घातला होता. लाखो लोक मृत्यु पावले होते. वर वर अतिशय निरागस वाटणाऱ्याया खेळाची पार्श्वभूमि या महाभयानक ग्रेट प्लेग ची होती.

मुळ रूप -रिंग-ओ-रिंग-ओ-रोझेस, पॉकेट फुल्ल ऑफ पोसिस, अॅशस अॅशस वी ऑल फॉल डाउन.

भूक

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 11/06/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.

आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं .

डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो.

बोलक्या जगातील... मुक्या कळ्या

लेखक अमृत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:22 या दिवशी प्रकाशित केले.

(मिपावर यापूर्वी लिहिलेल्या व या विषयाशी संबधीत असलेल्या प्रयास व वरदान या लेखांवर खूप सकारात्मक व आपुलकिच्या प्रतिक्रीया आल्यात म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.)

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

( १८ एप्रिल २०१५ रोजी या https://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ )
हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी!
..... ........ ........

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम."

निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते.

"बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना."

"अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात."

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.

दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते.

श्वास

लेखक मनो यांनी रविवार, 07/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.

ही वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये.

त्याचं वय फक्त ८ वर्षाचं. मनसोक्त खेळायचं हुंदडायचं ते वय . पण आज तो एका गाडीत मागल्या सीटवर कसाबसा श्वास घेत आपल्या मृत्युशी झगडत होता. गाडी रोजच्या रात्रीच्या मालवाहक trucks च्या रांगेत अडकली होती आणि त्याचा बाप त्या चक्रव्यूहातून दवाखान्याचा रस्ता शोधत होता.