Skip to main content

जीवनमान

७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 18/06/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात. आधी महत्वाचे: - नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा.

मानसिक होरपळ -रुग्णाच्या नातेवाईकांची...

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 17/06/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेला महिनाभर मी एका वेगळ्या ताणामध्ये वावरतेय. त्यासाठी ठरवलं की आता इथेच या विषयाला तोड फोडूया आणि पाहू की रुग्णाची जवळची नातेवाईक म्हणून मी माझ्यात अजून काय सुधारणा करायला हव्यात? माझ्या हातून काही चुकतंय का? म्हणून हा प्रपंच. त्याचं झालं असं : माझ्या बाबांना प्रोस्टेट कँसर झाल्याचं कळलं ही अचानकच म्हणजे अगदी आत्ता १ मे २०१५ च्या सुमारास आणि सगळ्या तपासण्यांमधून ऑपरेशन होईतो २ जून उजाडला. या काळात त्यांच्याच आग्रहामुळे मी कुणालाच- म्हणजे नातेवाईकांना हे कळू दिलं नाही. त्यांची चिडचिड नको म्हणून. त्यांच्याच कलाकलाने सगळं घेत होते/घेते आहे.

एक अपघात........ न केलेला.

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 16/06/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया. माझी नणंद सौ.

भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

लेखक आतिवास यांनी सोमवार, 15/06/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक दिवस सकाळी सहा वाजता मजिदचा फोन आला. “आज तुला घ्यायला गाडी अर्धा तास उशिरा येईल, चालेल का?” असं विचारायला.

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

लेखक खेडूत यांनी सोमवार, 15/06/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

रिंगा रिंगा रोझेस आणि श्रावण मासी.....

लेखक पद्मावति यांनी सोमवार, 15/06/2015 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असतांना आम्ही एक खेळ खेळायचो. रिंगा-रिंगा रोझेस म्हणत एकमेकांचा हात धरून गोल गोल फिरायचे आणि मग ते हाशा-हुशा करत धड़ामकन खाली पडायचे... ते गोल गोल फिरण्यात आणि पडण्यात आम्हाला फारच मजा यायची...आमचा हा अगदी फ़ेवरेट टाइमपास होता. पुढे कधीतरी एक पुस्तक वाचत असतांना त्यात या खेळाचा उल्लेख वाचला. तो असा कि सोळाव्या शतकात लंडन मधे प्लेग ने धूमाकुळ घातला होता. लाखो लोक मृत्यु पावले होते. वर वर अतिशय निरागस वाटणाऱ्याया खेळाची पार्श्वभूमि या महाभयानक ग्रेट प्लेग ची होती.

भूक

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 11/06/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे ! तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं . डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो. त्या निमित्ताने देशात बर्‍याच ठिकाणी फिरलो . आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे ! मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं. एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.

बोलक्या जगातील... मुक्या कळ्या

लेखक अमृत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर यापूर्वी लिहिलेल्या व या विषयाशी संबधीत असलेल्या प्रयास वरदान या लेखांवर खूप सकारात्मक व आपुलकिच्या प्रतिक्रीया आल्यात म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.) आजच्या लोकमतला एक बातमी आहे '१५४२ अपंगांना आधार'. महाराष्ट्र शासनातर्फे अपंगांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य केले जाते त्यासंबंधीची ही बातमी. बातमीत सुरूवातीलाच लिहिलय की अपंगाना शासकीय नोकरीत ३% आरक्षण असूनसुद्धा जवळपास ४०% अनुशेष आहे. हा इतका मोठा अनुशेष असण्यामागचे कारण काय? याचा कधी विचार केला गेलाय का?

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..