Skip to main content

जीवनमान

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

आयटीने काय(काय) दिले

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 14/07/2015 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
“तुम्हा आयटीवाल्यांनी महागाई वाढवून ठेवली आहे” आयटीवाले लोक शनिवारी रिकामेच असतात असा पक्का समज करुन आमच्या सोसायटीतले काका मला फाइलवर घेत होते. आयटीवाल्यांनी महागाई वाढवली हे माझ्यासाठी नवीनच होते. मी आपला समजत होतो की तो राजन ते Repo rate, CRR या न समजनाऱ्या इंग्रजी शब्दांत जो काही खेळ करतो त्यानेच महागाई वाढते किंवा कमी होते. “तसे नाही हो काका महागाई मागणी पुरवठ्याने वाढते. आयटी तर आताच आली महागाई तर केंव्हापासून वाढतच आहे.” “तुम्ही नका कबूल करु पण महागाई वाढली ती तुम्हा आयटीच्या लोकांमुळेच. तुम्ही आयटीवाले दोघेही नोकरी करनारे.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

चाळीतील आठवणी .....

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 13/07/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी ..... भाग १ला मुंबईपासून दूर ठाणे जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलात बी एम सी ची एक वसाहत होती. छोटेसे आटपाटनगरच होते ते, जेथे शाळा, मैदान,कल्याण केंद्र,वाचनालय ,शाळेची गाडी सगळ्या सोयी होत्या. कल्याणकेंद्रात कॅरम,बुद्धिबळ,टे.टेनिस,व्हॉलिबॉल,क्रिकेट,रिंग,उडीच्या दोऱ्या इ खेळ खेळायला मिळत. महिलांना शिवणकाम,भरतकाम,हस्तकला शिकवले जायचे. या वसाहतीत एक भली मोठी आंबराई होती ज्यात नारंगी,केशरी,खोबरी,आमटी (आंबट),साखरी,ढेकणी,बिट्टी,काळा, बाटली,.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

लेखक खेडूत यांनी सोमवार, 13/07/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

येडा गोप्या ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/07/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रंग्याने त्याच्या दप्तरातून सतरंजीची पट्टी बाहेर काढली आणि भिंतीच्या बाजुला बसलेल्या एका पोरावर खेकसला… “ए जाड्या, सर तिकडं. माझी जागा हाये ही. ” तसं ते पोरगं बाजूला सरकलं आणि रंग्याने आपली सतरंजी (पट्टी) तिथे अंथरली. अर्ध्या पट्टीवर स्वतः बसत, डोळ्यानीच मला पण बसायला सांगितलं. मी जरा घाबरतच खाली बसलो….. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेलो होतो. गावातल्या शाळेला अजुन सुट्टी लागलेली नव्हती. रंग्याबरोबर गावच्या शाळेत त्याच्या वर्गात येवून बसलो होतो.

पाऊस (शतशब्दकथा)

लेखक तिमा यांनी मंगळवार, 07/07/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पावसाचं कवतिक तुमा लोकांनला! पावसावर गानी लिवता, मोट्या मोट्या गाड्यांमदी भिजायला जाता तिकडं डोंगरात. आमाला काय त्याचं ? दर वर्साला येतोय आन जिनं हराम करतोय बगा. आत्ता, दर वरसाला झोपड्याचं पलास्टिक बदलायला पैका कुटं हाय ? औंदा पन असाच आला माज्या दादल्यासारका आन लई झोंबून ग्येलाय कुटं तरी उंडारायला! सगली बरबादी क्येली बगा माज्या संसाराची. आता नसला तरी पान्याची बोंब व्हनार.

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/07/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

कधीतरी काहीतरी भाग 3

लेखक prasadoak7 यांनी मंगळवार, 30/06/2015 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ झाली की दिवसभर सुनसान निस्तेज फुटपाथ ओसंडून वहायला लागतो. कामावरून जाताना रस्त्यातच भाजी खरेदी करूनच घरी जायच असा जणू अलिखित नियम आजकाल झाला आहे. हल्ली काही वर्षे आबाच रोजची भाजी आणत होते. खर तर हे माईंचे आवडते काम. पण काही वर्षांपूर्वी माई त्या आजारातून बर्‍या झाल्या तेव्हापासुन आबाच भाजी आणत. हळूहळू चालताना आबांना ते जुने दिवस आठवत होते. खरंतर माई पुर्णवेळ गृहीणी. घरची सर्व जबाबदारी आनंदाने त्या घेत होत्या. आबांची सकाळ छान गरमागरम चहाने झाली की त्याना कसे कृतकृत्य वाटे. सगळ आवरून कामाला निघताना आबांच्या हातात जेवणाचा डबा दिला की मग माईचा स्वतःचा दिवस सुरू होई.