Skip to main content

इतिहास

मार्गशीर्ष व. १ रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 03/01/2021 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. १ रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग! शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजी मराठेशाहीतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनी वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशी लढता लढतां प्राणत्याग केला. या वेळी इंग्रजांनी वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करून ते हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गॉडर्डनें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगी नानांनी जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविले. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनी त्याला अडविले.

मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 02/01/2021 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो) *** संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय.

देवीला बळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी बुधवार, 30/12/2020 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

लेखक मनो यांनी शुक्रवार, 18/12/2020 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल. YouTube: https://panipat-signup.web.app/live Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE Twitter: https://twitter.com/BhandarkarI उपस्थित मान्यवर --------------- शिवचरित्रकार श्री.

गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 02/12/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
संभाजी राजांचा उदय मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.

पुन्हा पानिपत!

लेखक मनो यांनी मंगळवार, 01/12/2020 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

गोव्याचा इतिहास- शिवकाल

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/11/2020 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे. आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे. आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही मात्र हि माहिती पुरेशी सविस्तर नसल्याने या कालखंडातील इतिहासावर

'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 22/11/2020 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत) मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते). अशा परिस्थितीतही ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या महाकादंबरीचे नाव चांगलेच दुमदुमत असल्याची बातमी मजपर्यंत पोचली होती.