Skip to main content

इतिहास

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ५ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 31/07/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ ) बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 28/07/2020 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ ) पौर्णिमेच्या रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला होता.सज्जाकोठीजवळ सहाशे बांदल सेना शस्त्रास्त्रांसह सज्ज होउन निघायच्या तयारीत होती.आज स्वराज्याचे प्राण त्यांना आपल्या खांद्यावर वाहून न्यायचे होते. आजच्या त्यांच्या कामगिरीवर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या कुंकवाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. शिवरायांसाठी पालखीची व्यवस्था केली होती.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 24/07/2020 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ ) पन्हाळ्यावर एकच लगबग सुरु होती. दारुगोळ्याच्या कोठ्याची तपासणी सुरु होती. कोल्हापुर परिसरातील बैलगाड्या धान्य भरुन रोज पन्हाळ्याचा चढ चढीत होत्या. गंगा,जमूना कोठीत छतापर्यंत धान्याच्या पोत्यांची रास लागलेली. गडाचा चोख बंदोबस्त झालेला होता. आणि एके दिवशी लांब पुर्वेकडून मोठी धुळ उडू लागली.गर्जना एकू येउ लागल्या, हिरवा चांदतारा फडकताना दिसत होता. जोहर पन्हाळ्याच्या रोखाने येत होता. पन्हाळ्याचा औरसचौरस आकार लांबूनच नजरेस येत होता.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 21/07/2020 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचू शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ ) चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते.

डोक्याला शॉट [तृतीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी गुरुवार, 18/06/2020 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 13/06/2020 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..

श्री शेषाद्री स्वामी - संक्षिप्त परिचय

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 07/06/2020 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे सर्वसामान्यपणे सत्पुरूषांमधे असते तसेच आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले.

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 01/06/2020 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.

'नालंदा विहार' - अंदमान तुरुंगातील अपारंपरिक विद्यास्त्रोत.

लेखक अभिबाबा यांनी शनिवार, 16/05/2020 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमान - निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला व आजही तितकाच स्वच्छ व सुंदर असलेला द्वीपसमूह. अरसिकालाही सौंदर्याची प्रेरणा देणारा हा आपला भूभाग; पण काळया पाण्याच्या शिक्षेवर दंडाबेडी घातली असताना अंदमानात पाऊल टाकणाऱ्या बॅरिस्टर सावरकरांना मात्र या ठिकाणी आढळले ते संरक्षणदृष्टया महत्वाचे असलेले हिंदुस्तानचे पूर्वेकडील प्रवेशद्वार. २०१० सालच्या मार्च महिन्यात पोर्ट ब्लेअर येथे झालेल्या स्वा.सावरकर मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंदमानला जाण्याचा योग आला.

नर्स एडिथ कॅवेल आणि प्रचार तंत्राचा महिमा

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 12/05/2020 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या महायुद्धाने तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अवयव प्रत्यारोपण, सुश्रुषा शास्त्र, उड्डयन तंत्र अशा अनेक शास्त्रीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवले तसेच व्यापार दळणवळण आर्थिक व्यवहार, अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि राजकारणह्या क्षेत्रावरही प्रभाव आणि दबाव टाकला. बरेचदा ह्यापैकी एका क्षेत्रातले बदल दुसर्या क्षेत्रावर परिणाम करत . प्रचार तंत्र किंवा प्रोपोगंडा हे एक असेच तंत्र ज्याला पहिल्या मह्युद्धात नावेच आयाम प्राप्त झाले. ह्या प्रचार तंत्राचा आणि ब्रिटीश नर्स एडिथ कॅवेल हिचा फार घनिष्ठ संबंध आहे तर आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने तिची हि हकीगत.