Skip to main content

इतिहास

आज काय घडले ... पौष शु. ५ तैमूरलंगाची भारतावर स्वारी !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 18/01/2021 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
तैमूर लाँग शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली ! तैमूरलंग जातीने तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होते. पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला.

आज काय घडले ... पौष शु. ४ प्रभू रामचंद्र-बिभीषण-भेट !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 17/01/2021 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
ram bibhishan bhet पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली. लंकेला आग लावून मारुति गेल्यानंतर रावण पुढे काय करावें या विचारांत असतां बिभोषणाने सुचविले- "राम धर्माने लढत आहे.

आज काय घडले... पौष शु. ३ “मोगलांस कृपावंत झाले!"

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 16/01/2021 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
raghoba dada शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला. पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामाने चांगलीच साधली. त्याने कारवाया सुरू करून मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. 'अविंधानें लबाडी केली.

आज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 15/01/2021 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म ! चौदाव्या शतकांत पौष शु. २ या दिवशी दत्त सांप्रदायांतील प्रसिद्ध पुरुष श्रीनृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला. शिव आणि विष्णु यांची उपासना एकरूपाने करणाऱ्या दत्त सांप्रदायाने महाराष्ट्रांत संस्कृती प्रसाराचे कार्य चांगलेच केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतर नृसिंहसरस्वतींचा अवतार झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरास अंबिका नांवाच्या स्त्रीस आशीर्वाद दिला होता की, " पुढील जन्मी तुला अलौकिक पुत्र होईल." ही अंबिकादेवी मरणोत्तर व-हाडांत कारंजगांवी जन्मास आली.

आज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाराम भागवत शास्त्री शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले. तीन वर्षे मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्यांजवळ पांच-सहा वर्षे संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवू लागले.

आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले. दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरून फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होते. त्या सरोवरांत मायेने पाण्याचे स्तंभन करून दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला.

मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि ! शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 12/01/2021 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... joga paramanand तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 11/01/2021 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
कर्ण वध आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध ! शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला. कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध अत्यंत निकराचे झाले.

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 10/01/2021 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
द्रोणाचार्य वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला. जयद्रथाचा वध झाल्यावर दुर्योधन द्रोणाचार्यांना टाकून बोलला, “आचार्य, आपण आंतून पांडवांकडील आहांत...." त्यावर द्रोण रागाने बोलले, "दुर्योधना, या वाक्शल्यांनी मला कां टोचतोस ?