Skip to main content

इतिहास

आज काय घडले... पौष शु. १३ केशवस्वामींचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 28/01/2021 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
केशव स्वामी शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले! महाराष्ट्रांतील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत.

आज काय घडले... पौष शु. १२ लंकेवरील स्वारीची तयारी !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष शु. १२ लंकेवरील स्वारीची तयारी ! पौष शु. १२ रोजी रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली वानरसैन्याकरवी लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रावर सेतु बांधून पूर्ण झाला. बिभीषण रामाच्या पक्षास येऊन मिळाला होता. त्याच्या सल्ल्यावरून सामोपचाराने समुद्रास अनुकूल करून घेण्याचा अध्यात्मिक सामर्थ्याने प्रयत्न रामाने केला, पण तो सफल झाला नाही. तेव्हां रामचंद्र क्रोधयुक्त होऊन म्हणाले, लक्ष्मणा, पाहिलात समुद्राचा गर्विष्ठपणा! अरे या जगांत कीर्ति वा यश सामोपचाराने मिळणे शक्य नाही. सर्वत्र हाती दंडा उगारून असलेल्या माणसालाच लोक मान देतात.

आज काय घडले... पौष शु. ११ केशवचंद्र सेन यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
keshavchandra sen शके १८०५ च्या पौष शु.११ रोजी थोर पुरुष, उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले. यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होते; यांच्या आजाचे नांव रामकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी ही यांच्या मातापितरांची नावे होती.

आज काय घडले.... पौष शु. १० चिमाजीअप्पांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले.... पौष शु. १० चिमाजीअप्पांचे निधन ! शके १६६२ च्या पौष शु. १० रोजी बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचे निधन झाले. वडिलांच्याबरोबर हे दिल्लीला गेले होते. थोरल्या बाजीरावांनी मोंगलाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले, तेव्हा हे माळवा प्रांतांत मुलुखगिरीवर होते. चिमाजीअप्पांचे नाव वसईच्या युद्धामुळे अमर झाले आहे. सन १७३१ पासूनच पोर्तुगीझ व मराठे यांचा बेबनाव वाढीस लागला. शेवटी सन १७३८-३९ साली मराठयांनी वसईचा संग्राम चांगलाच गाजविला. वसईवर विजय मिळत नाहींसें पाहून मोठ्या वीरश्रीने चिमाजी बोलले, “वसई ताब्यांत येत नाही. माझा हेतु तर ती घ्यावी असा आहे.

आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम ! शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशी पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली. या दिवशी सूर्योदयापूर्वी मरूं वा मारूं या भावनेने मराठ्यांची सेना वीरश्रीने मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचे तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वतः हल्ल्यात पुढे झाले.

आज काय घडले... पौष शु|| ७ दुसरा बाजीरावाने इंग्रजासवे वसई येथे तह केला

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 25/01/2021 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
vasaich taha शके १७२४ च्या पौष शु. ७ रोजी प्रसिद्ध असा वसईचा तह होऊन त्या दिवशी बाजीराव इंग्रजांना सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजीची इंग्रजांच्या मध्यस्थीने अनेक शकले झाली. यशवंतराव होळकराने पुण्यावर चाल केली तेव्हां दुसरा बाजीराव रायगड, महाड या ठिकाणी निघून गेला.

मांगी-तुंगी

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 20/01/2021 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.