Skip to main content

इतिहास

आज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 10/01/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
जनार्दन स्वामी शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली. जनार्दनस्वामी मूळचे चाळीसगांवचे देशपांडे. यांचा जन्म फाल्गून व. ६ शके १४२६ मध्ये झाला. पूर्वायुष्यांत हे यवनांच्या सेवेत होते.

आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 08/01/2021 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले.... मार्गशीर्ष व|| १० जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें!jayadratha vadh शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व.

स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 07/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्‍याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्‍या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा.

आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 07/01/2021 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... मार्गशीर्ष व. ९ कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध ! marathe ingraj शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !

लेखक Ashutosh badave यांनी बुधवार, 06/01/2021 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !पंडित मालवीय शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें.

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ७ हनुमंताचे वृत्तांत-निवेदन !

लेखक Ashutosh badave यांनी बुधवार, 06/01/2021 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
हनुमान रॅम भेट मार्गशीर्ष व. ७ ला श्रीहनुमान रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सीतेचा शोध लावून परत रामरायापाशी आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. लंकेंत रावणाच्या अंतःपुरांत असणाऱ्या अशोकवनांतील सीतेचा शोध मोठ्या युक्तीने हनुमानाने लावला आणि तिला रामाची सर्व हकीकत सांगितली. रामास सांगण्यासाठी तिचाहि निरोप घेतला.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 05/01/2021 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले. याच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच आईबाप निवर्तन होवून राज्याची वाताहात झाली होती. तेव्हां यांने 'नशीब' काढण्यासार्टी मोगल दरबारकडे धाव घेतली. मीर्झा जयसिंग याच्या पदरी तो राहू लागला. जयसिंगाबरोबर त्याने अनेक लढायांत पराक्रम करून दाखविला. परंतु पुढे मोंगल दरबारांतील बेइमानीपणा पाहून मोगलांच्या सेवेतून तो मुक्त झाला. याच वेळी श्रीशिवाजीमहाराज यांची आगऱ्याहून सुटका झाल्यामुळे त्यांचे नांव भारतांत दुमदुमून राहिले.

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ६ शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 05/01/2021 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ६ शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशी भारतीय युद्धांतलि कौरवां- कडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला. नऊ-दहा दिवस युद्ध होऊनहि पांडवांकडील कांहीं हानी होत नाहीसे पाहून जेव्हां दुर्योधन कर्णाकडे सेनापतिपद देण्याचा विचार करूं लागला त्या वेळी भीष्म संतप्त होऊन बोलले, 'उद्यां मी मरेन नाहीं तर पांडव तरी मरतील, उद्यां मी असे युद्ध करतो की, त्याची आठवण हजारों वर्षे लोक काढत राहतील. वीरश्रीच्या आवेशांत आचार्य कौरवसेनेस मागे टाकून बरेच पुढे गेले.

मार्गशीर्ष व. ४ स्वामी श्रद्धानंद यांचा खून !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 03/01/2021 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... स्वामी दयानंद शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशी सुप्रसिद्ध गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणे खून झाला. स्वामींचा जन्म शके १७७८ मध्ये पंजाबांतील तळवण गांवी झाला. यांचे मूळचे नांव मुनशीराम असे होते.