Skip to main content

इतिहास

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

लेखक चिंतातुर जंतू मंगळवार, 12/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो.

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

लेखक ईश आपटे मंगळवार, 12/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत.

झरण

लेखक रामदास मंगळवार, 12/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतो आहे ते चर्‍हाट आनि पाल्हाळच आहे पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे . म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे. फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची. तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं. नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते.

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

लेखक शरदिनी शुक्रवार, 08/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग
काव्यरस

उपेक्षित इतिहाससंशोधकाची मुलाखत

लेखक ईश आपटे बुधवार, 06/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा-२ ह्यापूर्वीचा लेख आपल्याला इथे वाचता येईल http://misalpav.com/node/17423 ......... तर गेल्या वेळी मी आमच्या इतिहास संशोधन पध्दतीचा परिचय करुन दिला होता. अर्थात त्याला वैचारिक दिशाभूल पध्दती म्हणणे योग्य होईल. ह्या वेळी थोडा दुसरा प्रसंग सांगणार आहे. मागच्या वेळी फक्त मनुवाद्यांच्या वाड्यात जावे लागले होते, ह्यावेळी प्रत्यक्ष एका प्रतिगामी इतिहास संशोधकाची भेट घ्यायची होती. खर तर आम्ही ह्याला इतिहास संशोधक अस म्हणत ही नाही, मिथकवादी, पुनरुज्जीवन वादी असे काही बाहि शब्द आम्ही वापरतो.