Skip to main content

इतिहास

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

'६ जून'.... भारतीय प्रमाणवेळ सायं. ५:२१ ३८८ वा राज्याभिषेक दिन.

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 06/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज खर्‍या खुर्‍या जाणत्या राजाचा 'राज्याभिषेक दिन' .......................... .......................... .......................... मनात आहे ना? बस्स झालं. काय मंडळी? नाहीतरी नुसता जयजयकार करुन काय उपयोग म्हणा?

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

लढाऊ विमाने - मिग-२१

लेखक निनाद यांनी गुरुवार, 19/05/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
लढाऊ विमाने यावर मराठीमध्ये फारशी माहिती दिसत नाही. ही माहितीची भर विकीवर घालत आहे. पण ती येथेही यावी म्हणून काही लेख देत आहे. आशा आहे ते आवडतील. या विमानाची चित्रे पाहण्यासाठी विकीवर जरूर भेट द्या! मिग-२१ मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपण नावानेही ओळखतात कारण हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते.

गजर (Journey of the soul)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 18/05/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
गजर (Journey of the soul) लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट --- १८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात .. त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या..