Skip to main content

इतिहास

बूटासिंगची गोष्ट !

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 31/01/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ज्ञात असणारा इतिहास हा प्रामुख्याने काही महत्त्वाची ऐतिहासिक पात्रे आणि घटना यासंबंधीचा असतो. याव्यतिरीक्तही भूतकाळात बरेच काही घडत असते, ज्याला फारसे ’मूल्य’ नसल्याने ते कोणी लक्षात ठेवत नाही. मात्र या घटना आपल्यासोबत त्या काळाच्या काही विवक्षीत खुणा घेऊन उभ्या असतात- ज्या पाहिल्यावर आपल्याला स्वत:चाच जुना फोटो पाहिल्यावर होतो, तशा जातीचा आनंद होतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ काळ: भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणी झाली, तेव्हाचा.

स्वा.सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी...

लेखक अमोल देशमुख यांनी रविवार, 30/01/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर यांना ईग्रजांनी दुस-या जन्मठेपेची शिक्षा सुनावली तो दिवस म्हणजे ३० जानेवारी १९११ आज ३० जानेवारी २०११ रोजी त्याला १०० वर्षे पुर्ण झाली, स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना विनम्र अभिवादन. १ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार केले, त्यानंतर नाशिक मध्ये २९ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मेसन जॉक्सन याला गोळ्या घालुन ठार मारले ब्रिटीशांनी या दोन्ही घटनांचे खरे सुत्रधार म्हणुन स्वा.सावरकरांना १३ मार्च १९१० (रविवार) रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरीया स्टेशनवर अटक क

राजे

लेखक जगप्रवासी यांनी शनिवार, 29/01/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, राजांचा उत्कृष्ट फोटो मि पा साठी . धन्यवाद जगप्रवासी.

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.

लोकशाहीच्या वाटेवर...

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 26/01/2011 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

अशीच एक राधा ....

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 20/01/2011 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक राधा.. ओळखलत ? नाही ना ? महाभारत ऽऽ... आठवतय काही ? राधा ऽऽ.. हो.. पण त्या कृष्णाची नाही मी सूतपत्नी, सूर्यपुत्राची माता.. राधा... अधोरेखीत होत आयुष्य माझ.. झाकोळलेल.. मान्य मी नाही कृष्णाची राधा अन नाही त्याचीच यशोधा माता पण मी आहे दानशूर कर्णाची माता... राधा.. अथांग मातृत्व माझ ..विस्मरणात गेलेल.. महाभारत म्हंटल की आठवतो.. आठवतो तो कृष्ण, अर्जुन आठवतो तो गंधारीपुत्र दुर्योधन आठवते यशोदा आणि पांडव माता कुंती आणि आठवतो माझा शापित सूर्यपुत्र ..कर्ण नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली काढली कवच कुंडले कर्णाची तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत..