Skip to main content

इतिहास

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.

कोडी

लेखक तिमा यांनी रविवार, 20/02/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते. एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला.

महाराजांना मुजरा

लेखक गणपा यांनी शनिवार, 19/02/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दिवशी महाराजांच विस्मरण होऊ नये. त्या जाणत्या राजास मानाचा मुजरा.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

शिरढोणचा ढाण्या वाघ

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 17/02/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिशांविरुद्ध ज्या अनेक कर्तबगार स्त्रीपुरुषांनी रान पेटवले, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही अशा अनेक नरवीरांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहित नाही असा सच्चा देशभक्त विरळाच होय ! आज १७ फेब्रुवारी.

क्रांती ~ आणि क्रांतीमधील एका 'आयकॉन' च्या फोटोची जादू...!!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी मंगळवार, 15/02/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
CheA" alt="CheA" /> इजिप्तमध्ये अखेर "क्रांती" झाली आणि एक सत्ता उलथवून टाकण्याची एकजुटीची शक्ती जनतेत कशी आणि केव्हा एकवटते याचे पुनश्च एकदा जगभरातील क्रांतीप्रेमींना प्रत्यंतर आले. अर्थात हा लेख त्या क्रांतीवर नसून एका क्रांतिवीरावर आहे.

३८१ वी स्मरण यात्रा.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 13/02/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! येत्या १९ फेब्रुवारीला आपल्या सार्‍या लोकांच्या २ आराध्यदैवतांपैकी (छ.शिवाजी अणि छ.संभाजी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८१ वी जयंती ! त्या निमित्ताने माझ्या आगामी ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्‍या आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील "झंझावात" या कादंबरीतील एक लेख इथे देत आहे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात (मि.पा.