Skip to main content

हे ठिकाण

नमस्कार...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 06/01/2010 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कसे आहात सगळे..? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर येतो आहे.. तूर्तास माझ्या आयुष्यात पुष्कळ काळी घटना घडत आहेत, घडल्या आहेत.. लाईफची एक बाजू खूप जवळून पाहायला मिळत आहे.. सगळी स्वप्न नसतात, वास्तवही असतं आणि ते खूप कटू असतं याचा पुन्हा एकदा अनुभव घेत आहे.. आणि कटू वास्तव भोगयला आपली चूक असावीच लागते असं नाही याचाही पुन्हा एकदा पुरेपूर अनुभव घेत आहे.. परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.. तूर्तास सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस फक्त मिपावर रहायचं म्हणतो आहे.. बाकी चालू द्या..

द्विधा

लेखक गिरिजा यांनी शनिवार, 02/01/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) "मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?" "काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.." "काय पण म्हणजे?" "बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.." ------------------------------------------------------------------------------------------------ "जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये" "हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.." "अस्सं?" "हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.." "हा! well.. that is like an additional thing..

वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 30/12/2009 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत.

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी गुरुवार, 17/12/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.

गोष्ट

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 12/11/2009 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला प्रत्येकाला लहानपणी २ गोष्टी सान्गितल्या होत्या. त्यातली एक छोटी आणि दुसरी न सम्पणारी. छोटी गोष्ट म्हणजे एक होत गाव, त्या गावात होत एक पोस्ट, सम्पली आमची गोष्ट. दुसरी न सम्पणारी गोष्ट म्हणजे एक धान्याच कोठार होत, तिथे एक चिमणी आली, एक दाणा घेतला आणि उडून गेली. दुसरी चिमणी आली एक दाणा घेतला आणि उडून गेली. तिसरी चिमणी आली......... या गोष्टीचा आपल्याला लहानपणी खूप राग यायचा पण आता अस नाही का वाटत की आयुष्यात बर्‍याच गोष्टी रिपीट होत असतात, मग ते रोजच जीवन असो, पिक्चर असो किन्वा इतर काही.

नवीन सदस्य

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी सोमवार, 09/11/2009 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार, मी मिपा चा एक नविन सदस्य आहे, आणी गेले काही दिवस इथे नियमितपणे वाचन करीत आहे. मलापण काही वेळा प्रतिसाद द्यावासा वाटतो म्हणून मी सदस्यत्व घेतल. मला इतक लिहायला सुद्धा बराच वेळ लागला. काही अक्षरे तर लिहिताच आली नाहीत. क्रूपया मार्गदर्शन करावे.

बुधवारची कविता: (दु:ख)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 05/11/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचे प्रतिसाद उडू नयेत म्हणून प्रयत्न करतात सदस्य माजू नये म्हणून कात्री लावतात तरीही जमले ना की त्यावर बा*वला भां** करतात संमालक माणसे पण इथे कंपूं सुख मिळू देत नाही अथवा उडलेल्या पोस्टमागे त्याना होत नाही दु:ख इथेच सगळी गोची आहे. क्रिप्टीकने पछाडलेले सदस्य चवचालपणा करणारी तरुण पोरे मिभोबळी,पाध्येबळी, डबलबॅरलबळी होणारे गटणे विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे हे सगळे जेव्हा बोर्डावर येत तेव्हा संपादित झालेले असते धुतलेले, बडवलेले, फाट्यावर मारलेले असते जळवणारे असते कोण म्हणे- कंपू वाईट नसतात, संपादकही चलाख असतात
काव्यरस

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
..

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
..