Skip to main content

हे ठिकाण

लोकपाल आणि भ्रष्टाचार...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 20/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : सगळ्यात पहीलं म्हणजे "चावून चोथा" अश्या विषयावर लिहून मिपाची जागा खातोय, ह्यासाठी "सॉरी शक्तिमान !".. लेखाचा उद्देश्य फक्त लोकपालबद्दल चर्चा करण्याचा आहे. ************************************************************** हां, तर आजकाल लोकपाल वर बरीच चर्चा सुरु आहे. टिव्ही, सरकार, माध्यमं सगळीकडे हेच.. "लोकपाल आणि लोकायुक्त" ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सगळ्यात आधी १९६८ मध्ये देण्यात आला. १९६९ मध्ये इंदिरा सरकारने संसदेत पहिल्यांदा हे बिल मांडले, पण पारीत झाले नाही. त्यानंतर आतापर्यंत जवळपास आठ-दहा वेळा हे बिल संसदेत आले, पण त्याचा कायदा झालेला नाही..

देव घरात काढायच्या रांगोळी डिझाईन!!

लेखक पूनम ब यांनी शुक्रवार, 04/11/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार भारती रांगोळी काढताना मध्यभागी कोणते डिझाईन काढावे असा नेहमी प्रश्न पडतो. मध्यभागी गणपती किंवा स्वस्तिक चे डिझाईन खूप सुरेख दिसते. माझ्या काही संस्कार भारती मधील गणपती डिझाईन आणि फ्री हेन्ड डिझाईन माझ्या मिपाव वरच्या मैत्रीणीना नक्कीच उपयोगी पडतील. :) या डिझाईन अत्यंत सोप्या आहेत. संस्कार भारती रांगोळी मध्ये किंवा देव घरात काढता येतील.

चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 10/10/2011 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो. नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी.. काय?.. सांगतो.. सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्‍या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या. तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच.

मनातलं, जनातलं

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
लिहु कि नको? का लिहावं? खरचं? काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी? इथेच का लिहाव? ...... आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय. आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत.. आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया.

मिथ्या-शास्त्रे - न्या. होम्सचा गमतीदार परिच्छेद

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 30/09/2011 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलिव्हर वेंडेल होम्स हा १९०२-१९३२ सालापर्यंत यू.एस. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात व्यायाधीश होता. बिंदूगामी पण गमतीदार लिखाण हा त्याचा हातखंडा होता. त्याचा हा परिच्छेद नुकताच वाचला, तो मजेदार आणि मननीय वाटला :
- - - - - मिथ्या-शास्त्रांबाबत (Pseudo-science) -
मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला मिथ्या-शास्त्राची व्याख्या देतो. मिथ्या-शास्त्रांत स्वतःचे खास शब्द (nomenclature) असलेले तंत्र असते.