Skip to main content

हे ठिकाण

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

मिसळपाव सदस्य

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 12/08/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकीवरही अनेक मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता मिपा चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे. {{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे मिपाचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.

अंतर

लेखक निनाव यांनी बुधवार, 10/08/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
3

तुम्ही नारळासारखे आहात..किंवा फणसासारखे..

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/08/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
जे ज्योतिषी शास्त्राचा अभ्यास करून अचूक भविष्य सांगतात त्यांना सादर वंदन करुन अन्य होतकरु रोजगारेच्छुक तरुणांसाठी एक स्वयंपूर्ण व्यवसायप्रस्ताव सुचवू इच्छितो. तुम्ही चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरु करा. गंमत नाही. खरंच.. एकदा का एखादी व्यक्ती भविष्य जाणण्यासाठी तुमच्या समोर जातीने आली तर तुम्ही कसल्याही विशेष शास्त्राचा वापर न करता अत्यंत इंप्रेसिव्ह आणि "वॉव" व्हॅल्यू असलेलं कथन करु शकता. याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये.

मनाचं मंथन

लेखक स्वप्ना_तुषार यांनी शुक्रवार, 01/07/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ... का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं .. बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली. खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता. ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली.

सर (भाग एक)

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 18/06/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
" डॉ. डी ए गुणगाडे, डी एस्सी., विभागप्रमुख, बायोटेक्नॉलोजी" दरवाजावर चकाकती सोनेरी पाटी होती. जितकी पाटी नवी होती तितकाच माणुसही नवा होता. मुळात हे डीपार्ट्मेंटच नव्याने सुरु झालेल.. जगात सगळीकडे बायोटेकचे नगारे वाजु लागल्यावर आपणही काहीतरी कराव अशी कळ आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंना नको त्या ठीकाणी आली अन त्यांनी जीवशास्त्र विभागातीलच अर्धा मजला या नव्या विभागासाठी दीला. बर त्यात गम्मत अशी करुन ठेवली की या विभागाला वेगळा विभागप्रमुख नेमला. हे म्हणजे नव्या नवरीला दोन दादले देण्यासारख होतं कारण या विभागाकडे विभागप्रमुख सोडुन काहीच नव्हतं. प्रोफेसर सगळे व्हीजिटींग..

विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 13/06/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे.

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 09/06/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.