Skip to main content

हे ठिकाण

शुभंकरोति

लेखक तिमा यांनी गुरुवार, 27/09/2012 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
शुभंकरोति काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा! स्कॅमं करोति कल्याणम भूखंड्म जलसंपदा सुष्टबुद्धी विनाशाय ब्रिगेडशक्ती नमोस्तुते || आजोबा, पणजोबा नमस्कार तुम्हीच आमचे तारणहार सर्वांना वाकून नमस्कार दिवा लावला दिल्लीपाशी आमची सत्ता घराण्यापाशी ||
काव्यरस

[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा

लेखक पुष्कर जोशी यांनी शनिवार, 22/09/2012 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी BSNL Brodband ४-५ वर्षा पासून वापरीत आहे... माझ्याकडे Type 1 मोडेम आहे ... साधारण महिन्या पूर्वी मोडेम चे अडाप्टर जळले ... ठीक आहे ना इतके वर्ष चालले बरेच आहे .... मग मी BSNL च्या कार्यालयात गेलो म्हटले कि original घ्यावे त्रास नको .. तर तिथे कळले कि आता हे लोक मोडेम विकतच नाहीत ते सरळ म्हणाले कि बाजारातून घ्या ... बाजारात शोध घेतल्यावर कळले कि अडप्टर सामान्य नाही जरा वेगळे आहे 10 V 550 mA .. त्यामुळे मला चटकन मिळेना ... आणि ब्रांडेड तर नाहीच नाही .... मग आठवले कि आपल्या कडे जुनी सोल्ड्रिंग गन आहे आपण कोणे एके काळी electronics चे विद्यार्थी होतो ..

प्रयत्न

लेखक Kavita Mahajan यांनी शुक्रवार, 21/09/2012 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संगणकावर मध्यंतरी काही चित्रं करून पाहिली. त्यातील हे एक.

दुरावलेलं..

लेखक गुड्डू यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परतीचा प्रवास, वाटेत फक्त अंधार.. क्षितिजाची फक्त चाहूल, बाकी सर्व काळोख.. रातकिड्यांची किर्र किर्र, हलकेच वाऱ्याची शिळ.. पत्थरांची रेलचेल पायी, ठेच - खाच खळगेची साथ.. असं कसं घडलं, नक्की कुठे पाल शिंकली.. सर्व काही नीट चालू असता, कशी सर्व घडी विस्कटली.. आपण सूर्याला गाठलेलं, त्याला हसून हस्तांदोलन केलेलं.. जे न पाहिलं त्या रवीने, ते आपण दोघांनी सहज अनुभवलेलं.. तसं आठवतं घडलेलं सर्व काही, पण मन काही मानत नाही.. आठवणी येत राहतात , मनातून काही जात नाही.. आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याल
काव्यरस

नवजन्म

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
घेता जन्म नाळ जुळली. आजन्म साथ मरणाची लाभली. आपुलेच प्रेत खांद्यावरी घेत. तुडवली जन्म मरणाशी येत. मुक्ती दिली आतुर जिवा. पांग फेडण्या नवजन्म हवा. रे मरणा नवजन्म हवा.

ते -१

लेखक स्पा यांनी गुरुवार, 20/09/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
टेकाडाचा चढ संपता संपत नसतो... धावून धावून छाती फुटायला आलेली असते , हातातला पलिता नाचवत तो वाट फुटेल तसा वर चढत असतो. डोक्यावरचा फेटा. सुटून पायात अडकत असला. तरी त्याला त्याच भान उरलेलं नसत..पुरुषभर उंचीच्या माजलेल्या गवतातून कसाबसा वाट काढत तो वर पोचतो.. भणाण वार त्याच्या कानात घुसतं, तसा तो भानावर येतो , धडाडणार काळीज काहीस शांत होतं. तो जिथून वर आला.. त्या टोकाला पाहतो .. दूर खाली.. आता अक्ख्या गढीने पेट घेतलेला असतो. आगीच्या ज्वाळा लपलप करत संपूर्ण गढीचा ग्रास गिळत असतात आतून येणारे भयंकर अभद्र आवाज. अजूनही त्याला ऐकू येत असतात .. तो गुढग्यांवर कोसळतो .

धोबीपछाड

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 20/09/2012 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
बोधकथा. तृतीयेला सकाळी सकाळी घरात चौघडा झडला. कारण कन्येन हरतालिकेच व्रत करण्याच . नवं रक्त ते. रगा रगात नुसता बालिशपणा अन आई पप्पा सांगतील त्याला विरोध भरलेला . नुसता आंधळा विरोध ! "अग आत्तापासून करशील तर जरा चांगला नवरा मिळेल" इत्यादी मी. "but why should I pray to God to get a good one? Can't I search it myself?" "अरे ! ऐक जरा आईंच. त्यांना बघा कसा छान नवरा मिळाला ?" सांगायला हव का? अर्थात पतीदेव. छाती चांगली दोन इंच फुगलेली (तरीही पोटाच्या घेराला माग न टाकू शकलेली .) नजरेत खट्याळपणा नुसता उतू चाललेला. "हे बघ असली उदाहरण देऊन तू तीला discourage करतोयस." मी "काय discourage ?

चावडीवरच्या गप्पा - प्रमोशन आणि आरक्षण

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/09/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत. “काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत. “अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात. “कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर “त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या. “अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून. “घ्या!