Skip to main content

धर्म

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.

पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

लेखक द्विज यांनी बुधवार, 19/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीराखा हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले भौतिकतेचे तामस मनातूनी सरले आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
Taxonomy upgrade extras

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 18/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली.

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 30/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे. आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो.

गणेशोत्सव जपानमधला

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 16/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे. तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे श्रींची मुर्ती हा कार्यक्रम हवाच !!!

अत्री जीव नाडी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी अंक २००८ साठी अत्री जीव नाडी विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९. नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.

विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.

गणेशभक्त सलमान!

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बेफाम गाडी चालवुन केलेला अपघात, केलेले तमाशे वगैरेसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सलमानने घरात गणपती बाप्पांना आणले, त्यांची सहकुटुंब पूजा अर्चा केली. या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे.

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 09/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !