Skip to main content

धर्म

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 18/04/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

रामाचे नवरात्र

लेखक मी ऋचा यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन प्रेरणा- हर्षद (५० फक्त) मिसळपाववर सदस्य होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पण प्रतिसादांच्या पूढे जाऊन आपल्याला काही लिहिता येणारच नाही अशी अकारण खात्री होती. पण हर्षदनी मला प्रोत्साहन देऊन नवरात्रावर लिहीच म्हणून उद्युक्त केलं आणि आज लिहुच म्हणून रामाचं नाव घेऊन सुरुवात करतेय.. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते.

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 12/04/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्‍या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.

जय श्रीराम...!!!

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभू रामचंद्र की जय! रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे. रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना. श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम। श्रीराम जयराम जयजय राम।

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 06/04/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही. मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले.. त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा... ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ... दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
. . . .II श्री अष्टविनायक प्रसन्न II आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, . ...

गुढीपाडवा

लेखक VINODBANKHELE यांनी मंगळवार, 05/04/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंचर मध्ये काल गुढीपाडवा घरोघरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारून उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षानिमित्त शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांत हजारो आंबेगावकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले. शहर भर रस्तोरस्ती भव्य भगवे झेंडे फडकावले होते हिंदू नववर्षारंभानिमित्त बजरंग दल आणि दुर्गावाहिनी तर्फे आज सायंकाळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा काढण्यात आली . स्वागतयात्रांच्या अग्रभागी गुढी व भगवे झेंडेधारी होते.