संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे.
परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता.