Skip to main content

छायाचित्रण

खरबुजाचा आस्वाद

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 14/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे. परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता.

आवडलेले क्लिक्स ..

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 06/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काही आवडलेले क्लिक्स ,छायाचित्रकाराच्या परवानगीने ,त्यांच्या नावासहित ... छायाचित्रकार : सुधिर क्षीरसागर . स्थळ : युरोप . . .

कबुतर...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 04/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी हा पक्षी आपल्या ( पक्षी:- माझ्या) लयं म्हणजी लयं डोक्यात जातो बघा ! का ? कसं हाय बघा, ते रस्त्यावरच्या मोकाट कुत्तरड्यां नंतर माझ्या साखर झोपेचे पार खोबरं करण्याचा मोलाचा वाटा ही मंडळी उचलत्यात ! च्यामायला ! नाय तांबड फुटल आकाशा मंदी तर् ह्यांच हुं हुं हुं हे असल इचित्र ओरडनं चालु व्हतं बघा ! बाकीचे पक्षी कसं गोड गात्यात... पर ह्यो काय इचित्रच आवाज काढतो ! पार डोक्याची ( हे हे हे समजलचं असलं तुम्हासनी ! ;)करुन टाकतो. कुत्र्यांन नंतर माणसांच्या वातावरणाशी जुळवुन घेणारी ही जमात...ज्या पशु पक्षांना जमले नाही त्यांची संख्या कमी झाली,म्हणजी चिमनी,कावले... पर ह्याची प्रजा अमाप वाढली !

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.

बारवीचे जंगल व आक्षीचा समुद्र..

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 20/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी अचानक एखादा छंद आपला ताबा घेतो. वेळात वेळ काढुन, कधी महत्वाच्या कामांनाही टांग मारुन आपण त्या दुनीयेत हरवायला बघतो. जे आपण करायला बघतो ते कितपत जमतय, याबाबत उत्सुकता तर असतेच. अशीच काही मी काढलेली छायाचित्र, आपल्या सुचनांसाठी आणी माझ्या सुधारणांसाठी... सुरवात आक्षीच्या किणार्‍यावरचे काही वेडर्स.. सॅन्ड प्लोव्हर्स.. कळपाने फिरणारे, कळपाने उडणारे...

क्लिक्स...

लेखक चिगो यांनी सोमवार, 13/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे.. १. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली.. २. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो.. ३.

प्राजक्त फुलला दारी

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा वाटायची.