सिंहगड व्हॅलीमध्ये मी खुप वेळा गेलोय. पण ते फक्त सिंहगडवर जाण्यासाठी. परंतू व्हॅलीमध्ये पक्षी पहाण्यासाठी म्हणून गेलो ते माझ्या एका मित्रासोबत. तेव्हा ठरवले की पुन्हा वेळ काढून नक्की जायचे. ’चॊकटराजे’ ना विचारले, ते तयार झाले.
शक्यतो फक्त फोटोग्राफीसाठी एवढा खटाटोप कशाला असे बरेच जणांचे म्हणणे असते. परंतू राजेसाहेब याला अपवाद आहेत.
शेवटी ०९ मे ला जायचे ठरले.
०९ मे ला सकाळी ५ वाजता चिंचवड वरून प्रस्थान केले. सकाळी लवकर बाहेर पडण्याचा फायदा हा की रस्त्यावर अजिबात वर्दळ नसते आणि आपण नियोजित स्थळी नियोजित वेळी पोचू शकतो. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मिळतात.