Skip to main content

चित्रपट

अगोरा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 06/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं? विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर? आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल.

अभिषेक, आमीर खान आणि ऐश्‍वर्या मराठी चित्रपटामध्ये !

लेखक मोगली यांनी शुक्रवार, 01/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले ! अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे. खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

बॉब खिस्तो अमर रहे ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 22/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर खलनायक बॉब खिस्तो यांचा अकाली मृत्यू" बॉब बद्दलच्या आपल्या आठवणी जाणण्यास उत्सुक ! http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-intervi…

सजदा..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 21/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं.. (येथे ऐका) रोम रोम तेरा नाम पुकारे एक हुए दिन रैन हमारे.. मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.) 'सजदा..' ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं.. तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे धडकन से तेज दौडू सपनो से आगे.. शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच.. अब जा लुट जाए ये जहा लुट जाए..

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-९)

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 20/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग-५) (भाग-६) (भाग-७) (भाग-८) पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात पाय रोवुन आपले स्थान निर्माण करणारी एकमेक महीला संगीतकार म्हणजे उषा खन्ना

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-८)

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग- ५) (भाग- ६) (भाग-७) या भागात २-५ चित्रपटांची कारकिर्द असलेल्या संगीतकारांना मागे ठेवुन यामधे सर्वात जास्त कारकिर्द असलेल्या संगीतकाराच्या कारकिर्दीचा आढा

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-७)

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 12/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग- ५) (भाग- ६) संगीत दिग्दर्शक- जानी बाबू कव्वाल खुप संदर्भ तपासुन पाहीले. खूप जणांना विचारून पाहीले. पण "नूरमहल" या एका चित्रपटाशीवाय संगीत दिगदर्शन केलेले दूसरे कोठलेही नाव सापडले नाही.

ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 11/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर.