ऍबल कॉन एला
चित्रपट कथा - वय सुचवणी १५ + साठी
ऍबल कॉन एला Hable con ella (इंग्रजी मध्ये - टॉक टू हर.)
बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो.
बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे.
मिसळपाव
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत.