'दिल्ली बेली' - एक बेली ढवळक अनुभव
"भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." अशी आर्त स्वरातली विनंती न ऐकून चालणारच नव्हतं. पहिल्यांदा हे गाणे ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला की हा का एवढं 'भागायला' सांगतोय. बरं, गंमत म्हणजे हे गाणं मी एका रम्य आणि शांत सकाळी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी अर्धवट झोपेत होतो; खिडकीतून उन्हाची कोवळी तिरीप माझ्या देखण्या चेहर्यावर प्रभा फाकवत होती; गॅसवर ठेवेलेल्या चहाच्या आधणाचा गोडसर उबदार वास नाकात शिरत होता; सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा मंद आवाज अस्पष्टपणे कानावर पडत होता, लिफ्टच्या दरवाजाचा आणि तो उघडा ठेवल्यानंतरच्या कर्कश अलार्मचा आवाज अधून-मधून कानावर पडत होता.
मिसळपाव
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.