मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.

मराठी भाषा

Bhagwanta Wayal ·
लेखनविषय:
ममराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा भाषा किती छान आपुली भाषा किती छान महाराष्ट्राची शान आपुली भाषा किती छान संत महत्मे होऊन गेले मराठी ग्रंथ लिहुन गेले आपुल्यासाठी ठेऊन गेले अद्वयताचे ज्ञान 'आपुली भाषा किती छान कवी लेखक अनेक झाले मराठी साहित्य लिहुन गेले आपल्यासाठी ठेऊन गेले शब्दरत्नांची खाण आपुली भाषा किती छान तिला बोलावी तशी ती बोलते तिला ओळवावी तशी ती वळते परप्रांतीयांना ही सहज कळते वाटे मला अभिमान आपुली भाषा.... माय लेकराचे नाते आपुले ह्रदयामध्ये त्याला मी जपले नाजुक शब्दांमध्ये गुंफले चरणी ठेऊन ध्यान आपुली भाषा किती छान बी डी वायळ

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत.

सकाळचा "च्या" ( वपु/शंकर पाटील .... स्टाईल )

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715 "सकाळचा "च्या" "चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक. वपु:- बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम. हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो. "जेनी चा बगडे एनी सवार बगडे " कनक शहा चं माहीत नाही पण माझी मात्र सकाळ बिघडते. अरे एखादा रवीवार येतो मस्त लोळत पडायचे.

भाषा - आपली सर्वांचीच

वडापाव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले.

लाल निळ्या रंगाचा इंगा

योगविवेक ·
लाल निळ्या रंगाचा इंगा  तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना  भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट? ' कम टू मीट यू सार.. ' ओके. टेल... आम्ही काही लोक पुण्यातील इंडॉलॉजिकल विषयक अभ्यास करत आहे. काही हस्तलिखिते आम्ही मिळवली आहेत. त्याचे विश्लेषण करायला  आपल्या विश्वविद्यालयात सोय करता येईन का यावर चर्चा करायला आपण थोडा वेळ द्याल अशी आशा आहे.

कॅसलिंग.......

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो इथे मिपावर चतुरंग काकांची भन्नाट कॉमेन्ट्री वाचून बुद्धीबळातील एका खेळी बद्दल लहानपणापासून असलेले कुतुहल पुन्हा जागे झाले. तसे आमच्या ग्यांगचे बुद्धीबळाचे ज्ञान तोकडेच. राजा कुठे फक्त एक घर चालु शकतो. उंट तिरका जातो. घोडा अडीच घरे जातो. हत्ती उभ्या आडव्या रेषेत फिरतो. प्यादे सरळ एकच घर फक्त सुरवातीला दोन घरे फक्त मारायला सरळ न जाता तिरके एक घर इतके नियम माहीत असले की झाले . आले बुद्धीबळ. उन्हाळ्यात पत्ते खेळताना विशेषतः गड्ड्या झब्बु च्यालेन्ज किंवा नाटेकाटेठोम खेळताना भरपूर आरडा ओरडा व्हायचा. च्यालेन्ज मधला च्यालेन्ज उचलेन्ज तर फार प्रिय. त्यामानाने बुद्धीबळ फार शांतपणे व्हायचे.

इंग्लिश मिडियम!! कशाला??

वडापाव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची?

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

एच्टूओ ·
लेखनप्रकार
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!