Skip to main content

भाषा

शाळा....!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 11/03/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बाल्कनीमध्ये उभा होतो.सहज म्हणून समोरच्या देशपांडेंच्या घरात लक्ष्य गेल.आज त्याच्या घरात बरीच गडबड ऐकू येत होती. काय तर म्हणे छोट्या प्रथमेशचा आज शाळेचा पहिला दिवस होता. घरात त्याच्याच तयारीची लगबग चालु असताना प्रथमेश मात्र अगदी तयार होउन दारात उभा होता. त्या दोन -सव्वा दोन फ़ुटी देहाची भारी गंमत चाललेली दिसत होती.

मातृभाषेची सेवा

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो.

झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक शरद यांनी रविवार, 01/03/2015 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्‍हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

अंग माझे

लेखक भीडस्त यांनी शुक्रवार, 26/12/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
वर्जिनल(टवाळ कार्टा) आनिक वर्जिनली वर्जिनल(सार्थबोध) कवी आश्या दोघाचिय्बी स्वारी मागूनसनी एक नमुना सादर क्येलेला हये....... घेता जरा 'धुवायला', घंगाळातले पाणी इथे साबु लावण्या अंगाला काय सांगू जाते माझे ।।१।। अट्टल पारोसे लाजतील,ओतता (शाम्पू) माझ्या डोईवरी अंगावरल्या समस्त रंध्रांत,घासणे जाऊ दे टोक तुझे ।।२।। या ऊरा-पोटावरील दिसती, जरी सार्या वळ्या ती तनु गबदुल असता,पाठीवरती मळ साचे ।।३।। पाठी ग धूऊ जाता तुला,पडतो लोटा भुईवरी पुन्हा करेल यत्न तोवरी,मळ राहिल (तैसाच) काय होते।।४।।

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

कोवळा हुंकार

लेखक समयांत यांनी सोमवार, 17/11/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.

बरळप्रहरी..

लेखक गवि यांनी बुधवार, 05/11/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

संभाषण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 29/10/2014 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित.. एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते.. एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति.. एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता.. एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते १ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल.. एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 28/10/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.