परीकथा भाग ५ - (फेसबूक स्टेटस १.७ ते १.९ वर्षे)
.
३१ ऑक्टोबर २०१५
आमच्या एफ एम रेडिओला सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे. हल्ली रोज नॉनस्टॉप नॉनसेन्स प्रादेशिक चॅनेल लागतात. नक्की कुठल्या प्रदेशाचे कार्यक्रम चालू असतात ते नाही समजत, पण योग्य ती फ्रिक्वेन्सी पकडली की मध्येच एखादा मराठी शब्द निघतो :)
.
.
५ नोव्हेंबर २०१५
बाथरूम ही आपल्याला पर्सनल स्पेस देणारी प्रायव्हेट जागा असते असा एक समज आहे. पण आमच्याकडे ते सुखही नाही.
तिला त्या क्षणी जगातली तीच व्यक्ती सर्वात लाडकी होते जी बाथरूममध्ये असते. मग ती मम्मी असो वा पप्पा, दारावर थडाथड लाथाबुक्के बसायला सुरुवात होते.
काल मात्र ही थडथड दोन्हीकडून अनुभवली.
मिसळपाव