Skip to main content

औषधोपचार

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

जोएल कटलर..

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कुठूनतरी मरणाशी संबंध असलेली पोस्ट वाटली तरी त्यातली आशा सर्वांना दिसेल अशी आशा आहे. ............
त्याचं नाव जोएल कटलर.
तिचं नाव क्रिस्टीन कटलर. जोएलची बायको.
त्यांना चार मुलं आहेत. सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत. वेळ सेटल्ड.
जोएलनं आयुष्यभर कष्टाची कामं केली.

मदत हवीय

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 23/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत. साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल. धन्यवाद, समीर

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

तुमची खादाडी- कर्करोगाचा उपास

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 28/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर विल्याम ली ह्याचं हे भाषण- कर्करोग कसा होतो आणि त्याला आहाराच्या माध्यमातून कसं दूर ठेवता येईल ह्याची शास्र्तोक्त माहीती देणारी ही चित्रफित. http://www.ted.com/talks/william_li.html अवांतर- सबटायटल्स उपलब्ध आहेत!

सरकारी योजना

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी योजना
माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई शाळा!
काव्यरस

शर्यत

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते- जुलै २००७ उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे. उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे. या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...

धक धक करने लगा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 26/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.