Skip to main content

औषधोपचार

प्रयत्न ..आता एकच !!

लेखक जेनी... यांनी सोमवार, 09/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थळ ...... गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ? ' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही? रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण कधीही फुटेल अश्या अव
काव्यरस

मी आणिक माझ्या तपासण्या

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 07/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रुटीन चेक अप साठी असाच आमच्या फॅमीली डॉक्टरांकडे गेलो होतो. हा आरोग्य विषयक जागरुकतेचा डास मला असा अधून मधून चावत असतो आणि मग मी झपाटल्या सारखा न चूकता, अहोरात्र, अविश्रांत, अविरत (म्हणजे सलग दोन ते तीन दिवस) सकाळचा वॉक, दोरीवरच्या ऊड्या, ३ ते ४ सुर्यनमस्कार (अगदी सुर्यदेवाला मी नक्की काय केलय ते कळायच्या आत आटोपतो) असे तत्सम प्रकार करतो. डॉक्टरांशी जुजबी गोष्टी झाल्यावर माझ्या प्रकॄती अस्वास्थ्याचे कारण सांगितल्यावर कम्प्लीट बॉडी चेक अप करून घे असा सल्ला उक्ती रुपाने आणि चिठ्ठी रुपाने दिलाने.

डॉ. संजय ओक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 07/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

प्रार्थना.. आता एकच...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 05/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आ
काव्यरस

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

प्रथमोपचार पेटी - First Aid Box

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 18/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमोपचार पेटी - First Aid Box प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.) जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती. १. Combiflam - ताप, अंगदुखी २. Crocin - ताप, डोकेदुखी ३. Disprin - डोकेदुखी ४. Alerid - D - सर्दीसाठी ५. Coldact - सर्दीसाठी ६. Cetrizane - सर्दीसाठी ७. Strepsil - घशात जळजळ ८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी ९. Eno - अ‍ॅसिडीटी १०. Gelusil - अ‍ॅसिडीटी ११.

दुसर्‍या कुत्र्याच्या प्रतिक्षेत ( तिचा कुत्रा -१)

लेखक रामजोशी यांनी मंगळवार, 15/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा कुत्रा - १ एक प्रयत्न. (विवेकरावांची क्षमा मागून) लहानपणापासुन ओळख होती आमची भेटत होते तसे रोजच. “मित्रच माझा” म्हणाली. 'हुषार आहे अगदी' हसले मी. 'कुत्रे असतातच हुषार' म्हणाले. 'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली 'हुशार हो अगदी सकाळी बाहेर जातो न चुकता घरावर तर लक्ष फार सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा. माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची? याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच आणि पर्टिक्युलरही.

काय बाई हौस ही !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 08/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
" चंद्रकांत तुकाराम कुंजीर (वय 51, रा. भारती विद्यापीठामागे, कात्रज) हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 2004 मध्ये याच महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका खासगी कंपनीत नोकरीस असलेली ही तीस वर्षीय तरुणी सप्तरंग आकाश, भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहते. कुंजीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे त्यांच्या मुलाची कुमारी माता होण्याची इच्छा व्यक्त केली. कुंजीर व तरुणीच्या नातेवाइकांनी समजूत काढूनसुद्धा ती बधली नाही.

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 05/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध : यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो. गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का?

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे.