Skip to main content

विरंगुळा

रॉक ऑन च्या निमित्ताने..

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 02/09/2008 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.

माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 31/08/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, (ह्या लेखातल्या ष्टोर्‍या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!) तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी. तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही.

नायागारा धबधब्याजवळील फोटो

लेखक धनंजय यांनी रविवार, 31/08/2008 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात नायागारा येथे गेलो होतो. नायागारा नदीची खोल दरी कॅनडा आणि संयुक्त राज्य(यू एस) यांना विभागते. तरी या दरीवर अनेक बळकट टिकाऊ पूल आहेत. इंद्रधनुष्य (रेनबो) पूल इंद्रधनुष्य (रेनबो) पूल दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.

रामूची आग अन्. आपली होरपळ!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 29/08/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.daijiworld.com/images1/glad_082508_phoonk2.jpg चि त्रपटगृहात जाऊन "फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. "फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली. रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः "रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी!

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....

लेखक मृगनयनी यांनी गुरुवार, 28/08/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी..... अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी..... हातामध्ये हात गुंफुनि, बालपणी ते बागडले .... अल्लडपणे त्या प्रेमाचे, बंध गुंफिले गेले... कधी राजाचे डोळे विचारिती, घरट्यात राहशील माझ्या? राणीला ही कळली त्याची, शब्दावाचूनि भाषा... वचन दिले त्यांनी परस्परांना, मानुनि जीवनसाथी... आयुष्यभर साथ देण्याच्या, बांधल्या रेशीमगाठी... त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली... राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली... ते दोधे आनंदाच्या डोही रमले, काळ लोटला काही... पण राजा-राणीचा हा संसार, नियतीला बघवला नाही... नियती अचानक एके दिवशी, वादळ घेऊनि आली...

भीती वाटे कुणाला?

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 27/08/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले. अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे.

(...आदिम घास...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 27/08/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;) ...आदिम घास... ================================ अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो... प्रत्येक असह्य कविता... जीवघेण्या प्रतिकांतून.. उपमांच्या कराल जबड्यांतून.. थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर.. दुबळ्या वाचकासारखं जगत..! त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी.. दुर्बल वाचकाचा लेखक झाला.. लेखकाचा झाला विडंबक... लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला... चक्रम.. विक्षिप्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आली.. वक्रोक्तीतली हूल...

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 26/08/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 25/08/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती.

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 25/08/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.