Skip to main content

विरंगुळा

श्रीमंत तात्या अभ्यंकर.

लेखक अभिज्ञ यांनी मंगळवार, 23/09/2008 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
संजोपराव व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांच्या लेखनशैलीवरून प्रेरित आमचा एक प्रयत्न. श्रीमंत तात्या अभ्यंकर. बुधवारची रात्र होती.तात्या खुशीतच होते.आज नव्या को-या ग्लेन्फ़िडिच चे उदघाटन त्यांनी केलेले होते. नुकतेच खाणेपिणे आटपून तात्या निद्रिस्त झाले असतील नसतील तोच तात्यांचा फ़ोन खणखणला. "अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे." तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता. त्याने दिलेली बातमि ऐकुन तात्याची झोप ठार उडालीच. कारण हि त्याला तसेच होते म्हणा.

कीरपाट कार्ट

लेखक लक्ष्मीकान्त यांनी मंगळवार, 23/09/2008 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा हिन्दीचा तास चालु होता सरानी झानटामाटीक सवाल विचारला खालील वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग करा. मूह मे पानी आना, वर्गामधे शेवटच्या बाकावर बसलेल कीरपाट कार्ट उभा रहील आनी म्हनाल मी करतो. सर म्हनाले बर मैने नल को मूह्न लगाया मूह मे पानी आ गया. हे ऐकल्यावर सराला दिन मे तारे नझर आले.

आमचेही (देशी) गणगोत

लेखक सुनील यांनी मंगळवार, 23/09/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा - मुक्तसुनीत यांचे http://www.misalpav.com/node/2920 "मने मने, अशी वेंधळ्यासारखी इकडे तिकडे काय बघतेस? ती बघ गावची चावडी. आणि तो जो माणूस उभा आहे ना, तो आहे गावचा सरपंच, तात्या अंमळ्नेरकर! " "काय म्हणालीस? त्याच्या हातातली काठी जनरल डायरच्या हंटरसारखी दिसते?" "अग, त्याच काय आहे - तात्यानं आता दुसरा घरोबा केलाय. तेव्हापासनं पहिलीच्या कडच्या काहीनी त्यांच्यावर डूख धरलाय. ते येतात कधी मधी त्याला त्रास द्यायला. त्यांना हाकलण्यासाठी ही काठी, बरे?" "तसा तात्या एकदम व्यवहारी हां.

ओंजळ (रान)फुलांची...

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 23/09/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांची फुले बघुन, आमची फुल ना (रान) फुलाची पाकळी.... १. २. ३. ४. ५.

सुगरण ??

लेखक झकासराव यांनी सोमवार, 22/09/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले. सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी. तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :) बघा बघा तुम्हीदेखील बघा. मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले. बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय. तिला काय जातय नुसतच सांगायला.

आणि थोडी ओली फुले

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 22/09/2008 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्या लोकांनी त्यांचे फोटो इथे टाकले, मग माझ्या कॅमेय्राला फार वाईट वाटायला लागलं. मला तो "आत्मवृत्तात" (तेच ते, आपण शाळेत लिहायचो ते) सांगत होता की त्यालापण तो किती चांगला आहे ते दाखवायचं आहे. आणि खरडवहीतल्या फोटोची बरीच चौकशी झाली त्यामुळे फारच उल्हसित झाला तो! मग काय मी गेले हापिसाच्या मुख्य इमारतीच्या समोर आणि वेडीवाकडी वाकून त्याला बिचाय्राला कामाला लावलं (इतरांकडून काम करवून घेण्याची माझी जुनीच खोड हो!).

प्रेमालाप

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 22/09/2008 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकर : प्रीये, तुझा चेहरा तर एखाद्या आरक्त कमळावर पडलेल्या दवबिंदू सारखा टवटवित दिसतो आहे. आणि मावळत्या सूर्याची कोवळी किरणे हलकेच त्याच्याशी लडिवाळपणा करीत आहे. आहाहा हा.. तुझ्याकडे पाहताना माझे भान कसे हरपून जाते आहे ! प्रेयसी : राजा, तुझे हे साहित्यिक बोलणे मला भारी आवडते. तुला या असल्या उपमा सुचतातच कश्या ते मला कळत नाही. प्रियकर : ते पहा प्रीये, तळ्यातल्या कमळफुलांनी कसा सुगंध या वातावरणात कोंदून भरला आहे. कमळाभोवती गुंजारव करणारे ते भ्रमर पहा कसे या कोमल समयाला उचित असा नाद करत आहेत. प्रेयसी : होय ना !