Skip to main content

विरंगुळा

तुझे भुल जाना जाना...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर... अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा साधारण १९८५ सालची. कथानायक माधव आणि नायिका रमा त्या काळाप्रमाणे चाळीतल्या दोन खोल्यात राहणारे तसे मध्यमवर्गीय सुखी जोडपे. रमा भविष्याविषयी काहीशी जागरूक तर माधव वर्तमानात रमणारा बराचसा बेफ़िकीर वृत्तीचा. विज्ञान कथा वाचन आणि भटकंती हे माधवचे छंद, तर असल्या छंदात पैसे उडवण्यापेक्षा बचत करून घर, जमीन-जुमला अशी स्थावर मालमत्ता वाढवायची असे रमाचे व्यवहारी विचार. असे असले तरी त्यांचे निदान अजून तरी खटके उडत नव्हते कारण त्यांच्या लग्नाला आता कुठे जेमतेम वर्षं पूर्ण होत आले होते. अशात एक दिवस माधवला त्यांच्या कारखान्यात वेतनवाढ होत असल्याची बातमी कळली.

मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 14/09/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत... तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका. ( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..) संदर्भासहित स्पष्टीकरण करा. १. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन. २.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. ३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व ३

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 12/09/2008 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सवाई गंधर्वचे आणखी काही फोटो आज टाकत आहे..... उस्ताद सुजाद खान : - उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-

माफीनामा!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/09/2008 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ संदर्भ : http://www.misalpav.com/node/3441 --------- "अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले. जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो. महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान! मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही.

मेगा`ब्लॉग'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/09/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये त्यांचा येरझारा चालू होता. सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती. ""सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली. मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक होतं. ""नो, थॅंक्‍स.'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं. बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं.