Skip to main content

विरंगुळा

(पेताडांच्या मेळ्यामध्ये !)

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 13/08/2008 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेताडांच्या मेळ्यामध्ये आम्ही माळकरी साधे तुम्हा रूचतील का हो माझे शेंगदाणे खाणे तुम्ही प्याल विलायती आम्ही कोकचे घुटके का हो तर्र मेळ्यात या तुम्ही बोलता बोबडे जन्म उजेडात गेला अमुचे चंद्राशी वाकडे जरा जमजून घ्यावे दात अजूनि दुधाचे जरा सरावुद्या हात, 'नीट' मिळू दे पेय मग सांगू अमुची व्यथा तुम्हालाही असंबद्ध !!! ------------------------- विडंबनासाठी प्रेरणा : अंकुश चव्हाण यांनी पोस्टलेली कविता http://www.misalpav.com/node/3028 आणि बिनडोक बनीने पोस्टलेली कविता http://www.misalpav.com/node/3029 -
Taxonomy upgrade extras

(एका मिसळीचे बिल भरलेच नाही !)

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 13/08/2008 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिसळीचे बिल भरलेच नाही दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही ते ठाऊक होतं कुणी खाताना काही बोललेच नाही एका खाण्याचे बिल भरलेच नाही खाण्या-पिण्याच्या वेळाही एक ठरूनच गेल्या बहुतेक वाट्या तर्रीच्या मिळाल्याच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही नजर भिरभिरते, मालकां शोधते दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी धस्तावते मालकाच्या नजरेस पडलेच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही असेना का भरले पोट तरी आजन्म ठेवतिल मिसळीस ओठी पैशांचे कोडे कधी पडलेच नाही एका मिसळीचे बिल भरलेच नाही -- ज्ञात (संदीप चित्रे) :) www.atakmatak.blogspot.com ---------- विडंबनासाठी प्रेरणा : पावस
Taxonomy upgrade extras

(वय साठावं लागलं की)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 13/08/2008 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा!

सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सिन्थॉल दादास, निरमाताईचा, सप्रेम नमस्कार वि.वि. तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला" वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने, "फेअरग्लोला " मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो. बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं. "सर्फ" मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी. मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या, "साबण जमातीची" दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.

पावसाळ्यातील एक दिवस

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 10/08/2008 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला, पाऊसही आला मजला, उठवण्या ||१|| आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट, धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी ||२|| गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट, बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ||३|| अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर', गाडीस मिळेना जोर, धावण्या ||४|| पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प, 'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ||५|| एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत, पकडली घराची वाट, सगळ्यांनी ||६|| माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून, 'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ||७||
Taxonomy upgrade extras

`नावा'त काय आहे?

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 09/08/2008 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं "साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का?' असा उद्धट प्रश्‍न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्‍यात चमकून गेला.