विरंगुळा
प्राजुच्या कल्पनेचा विस्तार !
कवितेची पार्श्वभूमी:
काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी --
हृदयात सागराच्या फेसाळती लाटा
प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !"
नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
Taxonomy upgrade extras
(खायचे आहे कुठे?)
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल!
काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे?
चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?...
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...
सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी
मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?...
दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी?
कोण तो?
लावणी
( चाल : रेशमाच्या रेघांनी )
रेशमच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे, माझा काढिला..
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ध्रु ||
चुक झालि माझी, लाखमोलाची ..
विचारंल मि, ही पोरं कोणाची, गं कोनाची
विसरंल आहे कोण, आहे कोण जोडिला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| १ ||
जात होति वाटेनं ती तोर्यात...
अवचीत आला बाप म्होर्यात, गं म्होर्यात
आणी माझ्या नरडीला, धरुनिया ओढीला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| २ ||
भीड नाही केली, आल्यागेल्याची....
मागितली माफी मी त्या मेल्याची, गं मेल्याचि
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ३ ||
(सदर विडंबनाच्
Taxonomy upgrade extras
गणपती विसर्जन सोहळा - पुणे
नमस्कार मंडळी.....
आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला.
आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला.
पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे.
याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे.
तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते.
मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिमतुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही...!
(अबू सालेम तुरुंगात त्याच्या साथीदाराला ऐकवतो)
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही..!
कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही..!
मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,
कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही..!
कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी.
कसे बाँबस्फ़ोटही घडवायचा दाऊदही..!
कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची,
जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही..!
आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!
-- अभिजीत दाते
मूळ गीत - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
कवी - संदीप खरे
Taxonomy upgrade extras
(टाळतो)
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;)
रोजचा छळवाद आता टाळतो
मी जरा व्यायाम आता टाळतो
पाहिजे आहे तनाला शांतता
कोणतीही चाल आता टाळतो
गोड 'केका'ची खुमारी आगळी
वरण-भाता हळुच आता टाळतो
सोडले पळणे, तरण केव्हाच मी
'जीम'चीही वाट आता टाळतो
घेर ढेरीचा कितीही वाढला
घोरण्याचे मी न आता टाळतो!
चतुरंग
अमेरीकेतला आमचा गणपती (मोदकांसहित)
काही फोटू अमेरीकेतल्या घरातले....
मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)
मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)
वाटले की शेवटी होकार झाला
******************
वाटले की शेवटी होकार झाला -
का विचारे मी पुन्हा इन्कार झाला?
***
जो कवी आनंद होता वांझ होता
घात होता तो बघा फनकार झाला!
***
ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी
तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला.
***
काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.
***
धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले
त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला.
***
होत गेला हो जयाला पारखा जो
होउनी आराध्य तो साकार झाला.
******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)Taxonomy upgrade extras
मिसळपाव