मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणि थोडी ओली फुले

३_१४ विक्षिप्त अदिती · · कलादालन
एवढ्या लोकांनी त्यांचे फोटो इथे टाकले, मग माझ्या कॅमेय्राला फार वाईट वाटायला लागलं. मला तो "आत्मवृत्तात" (तेच ते, आपण शाळेत लिहायचो ते) सांगत होता की त्यालापण तो किती चांगला आहे ते दाखवायचं आहे. आणि खरडवहीतल्या फोटोची बरीच चौकशी झाली त्यामुळे फारच उल्हसित झाला तो! मग काय मी गेले हापिसाच्या मुख्य इमारतीच्या समोर आणि वेडीवाकडी वाकून त्याला बिचाय्राला कामाला लावलं (इतरांकडून काम करवून घेण्याची माझी जुनीच खोड हो!). तर हे पहा ते फोटो.
लेखनविषय:

वाचने 10726 वाचनखूण प्रतिक्रिया 41

In reply to by मेघना भुस्कुटे

>> यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई. हं ... तसं मला बरंच काही येतं ... हिमेश रेशमियांची गाणी म्हणता येतात, पकवता येतं, अवांतर आणि वायफळच्या गप्पा मारता येतात, चिडवता येतं, टाईमपास करता येतो ... हॅ हॅ हॅ ... किती स्तुती करू स्वतःची, आता बास!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 23/09/2008 - 14:11
आमच्या आज्जींना अतर्क्य तर्क करता येतात, सिरेंटचा फक्त सिमेंट हा अर्थ लावता येतो (संदर्भ असून देखिल) , पोकळ युक्तिवाद करता येतात, पायतान घालण्या ऐवजी संपुर्ण जमिनीवर चमडे अंथरता येतं, आणि एंडलेस वॉर करता येते. व्हय का नाय आजे ... अति अति अवांतर : फुले माला आवडत नाहीत परंतू फोटू जरा बरे आले आहेत. अंगावर काटे आणनारी फोटूग्राफी असावी .. जसे सिंहाने आ केल्यावर त्याच्या दातावर बसलेल्या माशीचा फोटू , किंवा मगरीची पाठ खाजवताना काढलेला फोटू , भिकार्‍याच्या कटोरीतुन १ रुपया पळवतानाचा फोटू ई.ई. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मदनबाण 22/09/2008 - 20:07
४ नंबर चे फुल एकदम वेगळे वाटले..फुलात छोटे अजुन फुल !! हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला..या फुलाच नाव काय ? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 23/09/2008 - 14:23
"माहित नाही" म्हणतोय. आइला ... काय बोलतेस ? तुझा कॅमेरा बोलतो ? अरे वा !! भलताच हुशार आणि अँटिक कॅमेरा आहे आ ... आणि त्याला तु विचारलेला प्रश्न पण कळला .. मेन म्हणजे त्याने योग्य ते उत्तर दिलं ,,. ह्युमन इंटेलिजन्स कॅमेर्‍यात शिफ्ट झाला काय ग ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

झकासराव 22/09/2008 - 20:55
वा! मस्त आहेत सगळे फोटो. माझा सगळ्यात आवडता तिसरा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

रेवती 22/09/2008 - 21:45
पहिली दोन ब्येष्ट! लई अवांतरः अगा बया बया बया! ष्टुरी लिवायची सोडून ह्ये काय नविनच? रेवती

रसग्रहण- बर का आदिती, ती वल्ली फुल आस्ली त र्‍हाउं दे तशीच. उग पुसायच्या भानगडीत पडू नको. वाळतीन आपाप. प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला 23/09/2008 - 07:24
सही च आहेत !! शेवटचे फूल जास्त आवडले !! माझ्यातर्फे कॅमे-याला धन्यवाद !! (फोटो त्याने बिचा-यानेच काढले ना!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!! नाहीतर मी पण घाणेरीची फुलं दाखवून भाव खाईन!!!!:) बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

>> ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!! पिडाकाका, लिहिलंय ना वर, असे कठीण प्रश्न नाही विचारायचे, मग कॅमेरा हिरमुसतो. नाही माहित मला नावं, एकाचं सोडून! पाच नंबरचं लिलिचं आहे, एक आणि दोनपण त्यातलीच दिसताहेत. >> बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!! ती तीन नंबरच्या फोटोतली घाणेरीसारखीच आहेत ना? खरं आहे, एवढ्या छान फुलांना घाणेरी हे नाव कायतरीच वाटतं! >> अहो, फुलवंती बाई!!! मी काय फुलवंती बाई नाही आहे, मी अदिती आहे, तुमचा कायतरी गैरसमज झालाय! :-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ 23/09/2008 - 09:46
पहिली दोन लीली तिसरे :जिरॅनियम ( घाणेरी नाही) पाचवे :लिली सहावे : सातवे : झेन्डु डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

मनस्वी 23/09/2008 - 10:19
झेनिया आहे. झेंडू केशरी असतो. अदिती, सगळे फोटो मस्त आलेत! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

In reply to by मनस्वी

विजुभाऊ 23/09/2008 - 10:25
झेनीया नाही तो झेन्डु च आहे. झेन्डुच्या रंगात फिका पिवळा ते सोनेरी केशरी पर्यन्त छटा असु शकतात( माती नुसार/ जाती नुसार/ आणि सावली तसेच पाण्या नुसार) झेनीया च्या पाकळ्या एकेरी असतात. पाने जाड सलग असतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

ऋचा 23/09/2008 - 09:54
क्रमांक २ लै बेश्ट!!! बाकी पण छान आहेत . :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by प्रभाकर पेठकर

>> फुलांचे फोटो मस्त आहेत धन्यवाद. >> टेक्निकल माहिती विचारत नाही. फार देताही येणार नाही ... मी कॅनन पावरशॉट S3 IS वापरलाय. त्यातलं Digital IS वापरलं नाही आहे. बरेचसे फोटो कमीतकमी aperture ठेवून (F 2.7) काढायला लागले कारण खूप उजेड होता तेव्हा! आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही. काका, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे? पुतण्यांना छळणं. हा:..हा:. हा:... ते काय ते म्हणतात नं... जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, तोस्सी ग्रेट हो! :-) >> जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.) =)) मी यात फक्त अक्षरांना दिलेला रंगच पाह्यला! (साळसूद पुतणी) अदिती

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश 23/09/2008 - 16:12
जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
=)) =)) =)) बाकी फोटो मस्त ३ रा आणि शेवटच्या फुलांचे रंग लई भारी :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झकासराव 23/09/2008 - 17:40
आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.>>>>>>>>> तु जर फोटो फ्लिकर किंवा पिकासावर अपलोड केले असशील तर तिथे फोटोच्या उजव्या बाजुलाच शटर स्पीड अपेरेचर ही माहिती मिळेल प्रत्येक फोटोची. जर दिसत नसेल तर मोअर प्रॉपर्टिज वर क्लिक कर. :) कॅनन एस ३ आयएस. मस्त आहे तो कॅमेरा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

राघव 23/09/2008 - 13:23
खूप छान फोटोज.. २रे अन् ५वे सगळ्यात जास्त आवडलेत. :) मुमुक्षु

मृगनयनी 23/09/2008 - 17:28
मस्तच आहे गं फुलं! थोडीशी ओली असल्यामुळे, जास्तच टवटवीत दिसतायेत..... बाकी तुलाही फोटोग्राफीची आवड दिसते.... :) येऊ देत अजुन फुलं :)