Skip to main content

विरंगुळा

महामानव!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 09/10/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.bollywood.ac/wp-content/uploads/2007/10/43200651335pmhimesh… अवघी सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्‍वराचाही त्या दिवशी गोंधळ उडाला होता. कधी नव्हे एवढ्या पेचात तो सापडला होता. आपल्या हातून हा काय चमत्कार घडला, याचं त्याला राहून राहून आश्‍चर्य वाटत होतं. आतापर्यंत अष्टपैलू, अद्वितीय बुद्धिमत्तेचे, आरस्पानी सौंदर्याचे अनेक पुतळे त्यानं घडवून त्यांत प्राण फुंकले होते; पण हा नमुना काही अजबच होता.

अळूची भाजी खाऊन वाचलो तर.......

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/10/2008 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती.

(आनंदाने)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/10/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग
Taxonomy upgrade extras

मला भावलेली कविता

लेखक mina यांनी बुधवार, 08/10/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही निळया जांभळ्या नदीला आंबेवनाची सावली भेट पहिलीवहिली अकल्पित भेट दुरस्थपणाची गर्भरेशमी क्षणाची सौदामिनीच्या बाणाची देवघेव. गुलबक्षीच्या फुलानी गजबजले कुपण वेचू लागला श्रावण मोरपिसे। ओल्या आभाळाच्या खाली इद्रचापाचे तुकडे तुझा करपाश पडे जीवनास. कधी रेताडीचे रस्ते कधी मोहरली बाग कधी प्रासादास आग कर्पुराच्या। सप्तसुरातुनी गेले माझ्या जीवनाचे गीत तुझ्या सारगीची तात साथ झाली. बर्फवाट शिशिराची आता पुढलिया देशी तुझ्या मिठीची असोशी अजूनही. -कवी कुसुमाग्रज
Taxonomy upgrade extras

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 08/10/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.