Skip to main content

विरंगुळा

आम्ही पेट्स ठेवतो !

लेखक चाफा यांनी बुधवार, 05/11/2008 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!! साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास आढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ.

भूमीका

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 05/11/2008 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला. "अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल. गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली. "चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे" गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.

शल्या !

लेखक चाफा यांनी बुधवार, 05/11/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर शल्या हे संपुर्ण काल्पनिक पात्र नाही, पण पुर्णार्थाने खरेही नाही त्यातुन ह्या कथेत बाकी बर्‍याच जणांनी हजेरी लावलीये ( माझ्या सकट ) त्यामुळे................. !

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 04/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

भिती !

लेखक चाफा यांनी सोमवार, 03/11/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रींग फ़ोनने आपण जिवंत असल्याची घोषणा केली आणि वैतागत हातातले मासिक टाकत निशांतने फ़ोनला हात घातला. " कोण"? त्याच्या आवाजातला वैताग जाणवत होता. " मी स्वप्ना बोलतेय". पलिकडून उत्तर आले. " कोण स्वप्ना" " अरे स्वप्ना, स्वप्नाली तुझी मैत्रिण"! " अरे स्वप्ना तु? इतक्या दिवसांनी नाही वर्षांनी फ़ोन करतेयस? कुठे होतीस इतके दिवस विसरलीस की काय मला?" अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारतोस, तुला माहिताय ना माझ्या पपांच्या बदलीनंतर आम्ही सगळेजण बंगलोरला गेलो". " ते माहीताय गं मला पण त्या नंतर तु माझ्याशी संपर्कच ठेवला नाहीस ईतक्या दिवसांची दोस्ती एकदम कचरापेटीत टाकलीस" "चिडतो काय रे?

सेनापती कापशी

लेखक रम्या यांनी सोमवार, 03/11/2008 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या.

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

बघ तुला आठवण येते का ?

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 03/11/2008 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
(सौमित्र ह्यांच्या 'बघ तुला माझी आठवण येते का' ह्या कवितेच स्वैर विडंबन करण्याचा एक प्रयत्न) कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? खिडकी बंद करून घे. दिवे पंखे मालव. सर्व नळ बंद करून टाक. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर. डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण. नाहीच आठवली तर भीमरूपी महारुद्रा म्हण. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड. चालत रहा भिती कमी होईपर्यंत. ती कमी होणार नाहीच. मग घरी ये. साडी बदलू नकोस.
Taxonomy upgrade extras

(तसा कुठे मी....)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 03/11/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!