Skip to main content

(जर्रा खाजवा की)

लेखक सुनील
Published on बुधवार, 25/08/2010
त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो. आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?" तो म्हणाला, "मी खाजवू?" मी दचकून ओरडलो, "नक्को...." नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!! बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!! मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?" तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो. तुझं आपलं उलटचं!" तेव्हापासनं कानाला खडा! आता प्यायला जायचं असलं की, मी माझा स्वतःचा स्टरर घेऊन जातो! खाज आली तरी चिंता नाही!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2296
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अहो....पाठीची नाय! पिण्याची खाज दिसते तुम्हास्नी......हे हे हे.

ओ मालक, त्या प्रिटी वुमनचा पुढचा भाग कधी ? लै वाट पाहुन र्‍हायलोय ना भौ !!!

In reply to by छोटा डॉन

मालक हे पाचकळ धंदे पुरे करा आता आणि 'प्रिटी वूमन'ला आणा परत!

In reply to by धमाल मुलगा

तुम्ही ह्यॅ:!ह्यॅ:!ह्यॅ:!ह्यॅ:! करु नका तुमचे पोकळवाडीचे चमत्कार आणि शिकार कथा अपुर्ण आहेत त्या पहिल्या पुर्ण करा