रांगोळी
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते.
रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.
मिसळपाव
सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.