Skip to main content

विरंगुळा

अरुंधती !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 19/10/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! गेले २-३ दिवस गणपाभै नी टाकलेल्या भयपटा च्या धाग्यावर वेगवेगळे प्रतीसाद वाचले.अजुनही धागा पहील्या पानावरच आहे.आलेले सारे प्रतीसाद हा लेख लिहुन (हो ! हो !

दुचाकीवर चारपायी

लेखक सुत्रधार यांनी मंगळवार, 19/10/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
दसर्‍याला दुचाकीवरुन जरा बाहेर पडलो आणि एक अविस्मरणिय द्रुष्य पहिल. 2V4

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

`अन्नोन'दशा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/10/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी बाइकवरून कुठेतरी निघालो होतो आणि राजाराम पुलाजवळील सिग्नलच्या अलीकडेच मोबाईल वाजला. "सायलेंट' करायला विसरलो होतो आणि व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं. कुठला तरी "अननोन' नंबर होता. ""सर तुम्ही अभिजित पेंढारकरच बोलताय ना?'' ""हो, बोला.'' ""सर, मी जळगावहून बोलतेय, तुमचा "प्रीमियर'मधला लेख वाचला.'' व्हायब्रेटरवर असलेल्या मोबाईलमुळे दडपलेली माझी छाती आता फुगली होती. सत्काराच्या वेळी हार घालण्यासाठी मान वाकवून ठेवतात, तशी मी लेखनाबद्दलची प्रशंसा ऐकण्यासाठी माझे कान मी मोबाईलच्या अधिकाधिक जवळ आणले.

कार्टीचा पराक्रम

लेखक रन्गराव यांनी रविवार, 17/10/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पोरं चिड्ल की काय करतात ह्याचा लई भारी नमुना आहे हा. ईंग्रजीमध्यी आहे पन सगळ्यांना नक्की आवडेल

तुमचा आवडता भयपट कोणता ?

लेखक गणपा यांनी शनिवार, 16/10/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं. पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो. येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे. असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'. बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.

सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 15/10/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता. आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची. अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते.