Skip to main content

विरंगुळा

डाविकडुन उजविकडे तोंड आनि शेपुट हलविनारि गोगलगाय

लेखक नरेशकुमार यांनी शुक्रवार, 12/11/2010 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घराच्या मागे हि भेटलि, हिच तोंड डाविकडुन उजविकडे होत होते. शेपुट सुद्धा हलत होत. हिच कवच खुप कड्क असत, एवढच माहितिये, अजुन कोनाला माहिति अस्ल्यास प्रतिक्रिया द्या. हळुहळु चालते गोगलगाय, पोटात पाय असतात असे ऐकले आहे. खायला खुप छान लागते, अस ऐकलय, पन मि नाहि खाल्लि अजुन. कोन खात असल्यास रेसेपि पण द्या. (माझि आजि माझ्या बायकोला गोगलगाय म्हनते. का ? ते माहित नाहि. कोनाला समजल्यास ते सुद्धा लिहा.) खुप मुश्किलिने लिहिले आहे, अध्यक्शान्ना विनंतिं हे उडवु नका. प्लिज

टु पेंट ऑर मेक लव्ह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 11/11/2010 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे. जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे. -निनाद फ्रेंच चित्रपट टु पेंट ऑर मेक लव्ह मॅडेलीन (सबीन अझेमा) ही एक मध्यमवयीन हौशी चित्रकार आहे. शिवाय ती स्वतःचा व्यवसायही चालवते. तीच नवरा विलियम (डॅनियल अत्वाल) हा हवामान खात्यात नोकरी करतो. पण त्याने आता मुदतपूर्व निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दांपत्याला एक मुलगी आहे. ती ला आता शिष्यवृत्ती मिळाल्याने ती इटलीमध्ये रोमला जाते आहे. आता हे दोघेच आहेत.

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/11/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

पार्टी गेम्स

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 10/11/2010 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही पार्टी गेम्स ....तुम्हा सर्वांसाठी. हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत. १.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे. पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे. (अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? ) २.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 09/11/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला विरोधी लोकमताचा जबरदस्त फटका बसला, त्या पक्षाचे अगदी 'पानीपत'च झाले असे म्हणायला हरकत नाहीं. त्या पक्षाचे प्रतिनिधीगृहातील बहुमत तर संपुष्टातच आले व सिनेटमधे जवळ-जवळ ६० टक्के जागा ज्या पक्षाकडे होत्या त्यांची संख्या ५३-५४ टक्क्यावर आली. नवनिर्वाचित राज्यपालांच्या संख्येतही डेमोक्रॅटिक पक्षाला कमी जागा मिळाल्या. हे सर्व कां झाले हे मला कळत नाहीं आणि ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.

हशा- खास कोल्हापुरी

लेखक रन्गराव यांनी मंगळवार, 09/11/2010 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
संतोष शिंदे ह्या कलाकराच्या हास्य सम्राट ह्या कार्यक्रमातील ह्या दोन चित्रफिती १. पुरूषप्रधान संस्कृती - http://www.youtube.com/watch?v=xEZqd8ddO0M २. कोल्हापुरी भाषेची वैशिष्ट्य- http://www.youtube.com/watch?v=nPYkO4Tj9M0

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..