Skip to main content

विरंगुळा

गोष्ट-२ लिंगबदल

लेखक शरद यांनी शनिवार, 27/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगबदल भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते". भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले.

रेस कोर्स..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/11/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात. रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो. चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर. दुसर्‍या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात. त्या बिचार्‍या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते ! जयंत कुलकर्णी. www.jayantsphotography.wordpress.com

५. सार्वजनिक सुविधा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 25/11/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या पाणवठ्यावर उडणारा गडबड गोंधळ, आरडा ओरडा, वादावादी आजोळच्या सार्वजनिक नळावर कधी पहायला मिळाली नाही. सकाळी सात वाजता नळ आला (माझ्या दृष्टीने नवा वाक्प्रचार) की चाळीतल्या भांड्यांची धावपळ उडे. परंतु तीही शिस्तीत. खोली क्रमांकानुसार पाणी भरायचं. साधारणतः चार कुटुंबात एक नळ म्हणजे तोटी ठरवून दिलेली. एक नंबरच्या कुटुंबाने चार नंबरच्या नळाकडे जायचं नाही तर चार नंबरवाल्यांनी एक नंबरच्या तोटीखाली भांडं सरकवाचं नाही. असा अलिखित नियम असायचा, पाळलाही जायचा. गावाकडच्या बायकांना गप्पा झोडायला, चारचौघीत भांडणं उकरायला निवांत वेळ असायचा. नळ जाण्याची (आणखी एक वाक्प्रचार) त्यांना चिँता कसली?

झिंग थिंग..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे.. आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली .. पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!! संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली.. हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !! मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने.. गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!! कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला.. लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं.. त्याचा पुनर्जन्म झाला.. आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !! ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही.. लाईम अँड लेमोनी लिम्का..

प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 23/11/2010 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय! प्रकाश बजाज यांना कोण ओळखत नाहीं? मुंबई शिरकाणानंतर त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पहिल्या पत्राने ते स्वतः तर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात तर आलेच पण त्यांनी "Word format" मध्ये लिहिलेल्या पत्राला खाली कुणीतरी जाणता-अजाणता ते टाइम्स ऑफ इंडिया चे सहसंपादक असल्याचे घुसवून दिले व त्यासाठी टाइम्सने त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरायची तयारी केली होती असे त्यांनीच मला सांगितले. त्यांना मी यापुढे pdf format मध्ये लिहीत जा असा सल्ला दिला तरीही हा पठ्ठ्या अजूनही Word format मध्येच लिहितो. आमची बर्‍यापैकी गट्टी जमली असून लवकरच आम्ही एकमेकांना भेटणार आहोत!

४. पतंग आणि वावडी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 23/11/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जानेवारी महिन्यात कोणा नातेवाईकांकडील कार्यक्रमानिमित्त पुण्याला जाण्याचा योग आला. 'ह्या म्हैनात काय बी मज्जा असनार न्हाय बग. मी नस्तो आल्लो तरीबी चाल्लं अस्तं.' एस् टी ने अर्धा रस्ता संपवल्यावर मला हा साक्षात्कार झालेला. 'अरे जानेवारीमधे पुण्याची मुलं पतंग उडवतात, काटाकाटी खेळतात.' आईने माहिती पुरवल्यावर मी चेकाळलो. 'हैच शबास. म्हंजी पतंगी उडवाया घावणार? काटाकाटी खेळायाबी? मंग तं मज्जाच मज्जा भो.' 'पण जास्त दंगा करायचा नाही पतंग खेळतांना. काय?' उत्तर द्यायच्या मनस्थितीत मी नव्हतोच.

स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नाव

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 23/11/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली. असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही. त्यातील काही नावे म्हणजे: 'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता.

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

खिचडी : दिवाळी निमित्त सहकाऱ्यांनी सादर केलेले एक छोटे नाटक.

लेखक Manoj Katwe यांनी मंगळवार, 23/11/2010 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे. सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'.

विडा

लेखक शुचि यांनी मंगळवार, 23/11/2010 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला.